supreme court esakal
देश

Supreme Court : सुप्रीम कोर्टालाही मिळणार नवीन इमारत; सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः संसदेला नवीन इमारत मिळाल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयालादेखील नवीन इमारत मिळणार आहे. खुद्द सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी याबाबतची घोषणा केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरामध्ये बार असोसिएशनकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त समारंभाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत होते.

CJI चंद्रचूड यांनी आज बोलताना सांगितलं की, सुप्रीम कोर्टामध्ये नवीन इमारत उभी करण्यात येणार आहे. नवीन इमारतीमध्ये अतिरिक्त २७ कोर्ट, ४ रजिस्ट्रार कोर्टरुम आणि इतर पुरेशा सुविधा असणार आहेत.

चंद्रचूड पुढे म्हणाले की, वेळेत न्याय मिळणे आणि न्याय व्यवस्थेचं सुलभीकरण करणे हे न्यायपालीकेसमोर मोठं आव्हान आहे. समाजव्यवस्थेच्या शेवटच्या घटकाला न्यायप्रणाली सोपी वाटली पाहिजे, यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

भारतीय भाषांमध्ये कोर्टाच्या निकालाचं भाषांतर होण्यासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणामध्ये म्हटलं होतं. त्याचाही उल्लेख सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी बोलतांना केला. तसेच न्यायप्रणालीला सुगम करण्यासाठी व्यापक बदल अपेक्षित आहेत, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tawde Hotel Encroachment : कोल्हापुरात महापालिकेचा मोठा दणका! तावडे हॉटेल परिसरातील अनधिकृत बांधकामांवर आज चालणार जेसीबी; कडक आदेश जारी

Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गात पावसाचं दणक्यात पुनरागमन! घाटमाथ्यावरही धुवाधार; पुढील तीन ते चार दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज

ढिंग टांग : ऑल इज वेल..!

Pune: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी, पुढील चार दिवस यलो अलर्ट

Paithan Road Accident : पैठणमध्ये पिकअपची दुचाकीला धडक, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT