देश

सर्वोच्च न्यायालयातील कामकाज आता "लाइव्ह' 

पीटीआय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील कामकाजाचे थेट प्रसारण आता सर्वांना पाहता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानेच आज त्यासाठी परवानगी दिली. थेट प्रसारणामुळे न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल. लोकहिताच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे,' असे न्यायालयाने या वेळी नमूद केले. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर आणि धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला. "न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रेक्षपणाची सुरवात सर्वोच्च न्यायालयापासूनच होणार असून, त्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. या थेट प्रेक्षपणासाठी न्यायिक यंत्रणा जबाबदार असणार आहे,' असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायालयातील महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले होते. त्यावर सरन्यायाधीशांकडून होत असलेल्या संवैधानिक खटल्याच्या सुनावणीचे चाचणी तत्त्वावर प्रसारण करता येऊ शकते, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले होते. न्यायालयीन प्रक्रियेच्या थेट प्रक्षेपणासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केला जाऊ शकतो, असे केंद्राने सांगितले होते. 

संवैधानिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकरणांच्या सुनावणीचे थेट प्रसारण केले जावे. हा नागरिकांचा अधिकार आहे. पाश्‍चात्त्य देशांत तशी पद्धत आहे, असे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांनी याबाबत दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : विद्यार्थ्यांसोबत सरकार क्रूरपणे वागले, इंग्रज परवडले : उद्धव ठाकरे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT