देश

'मोहन डेलकर यांची आत्महत्या हा तर…'; सुप्रिया सुळेंचं लोकसभा अध्यक्षांना पत्र 

सकाळवृत्तसेवा

दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. राज्य सरकारमार्फंत चौकशीसाठी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. डेलकर यांच्या आत्महत्यासंदर्भात राजकीय वातावरण चांगलेच तापलेलं आहे. आता याप्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिलं आहे.

फेब्रुवारीमध्ये डेलकर मुंबईतील हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडले होते. डेलकर यांनी त्यांच्या लेटरहेडवर 15 पानांची सुसाईट नोट लिहिली होती. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपावर निशाणा साधला. 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, या मागणीसाठी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिलं आहे. बुधवारी, त्यांची भेट घेऊन, मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. आपल्या पत्रात सुप्रिया सुले म्हणाल्यात की,  'मोहन डेलकर यांची आत्महत्या हा फक्त एका जिवाचा अंत नसून तो थेट देशाच्या संसदेच्या प्रतिष्ठेला धक्का आहे.'

मोहन डेलकर दादरा-नगर हवेलीमधील लोकप्रिय नेते होते. त्यांनी सात वेळालोकसभेची निवडणूक जिंकली होती. २२ फेब्रुवारीला दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथील हॉटेलमध्ये ते मृतावस्थेत आढळले. शवविच्छेदन अहवालातून मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आलं.   
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

Manchar Accident : दोन भीषण अपघातांत खेड तालुक्यातील दोघांचा व आंबेगाव तालुक्यातील एकाचा मृत्यू; एक गंभीर जखमी

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT