Supriya Sule 
देश

खासदारांचं निलंबन 'स्क्रिप्टेड'; सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर घणाघाती आरोप

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्यसभेत विधेयक मंजूर करून घेण्यासाठी आकडे कमी पडत असल्याकारणानेच खासदारांचं निलंबन करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन हे स्क्रिप्टेड असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. उत्तर प्रदेशातील सर्व्हेमुळेच भाजप निराश आहे आणि त्यातूनच भाजपकडून याप्रकारची वर्तवणूक घडत असलेली दिसून येत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, मला विचाराल तर आज अतिशय दुर्दैवी दिवस आहे. आम्ही, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी ठरवलं होतं की शांततेतच चर्चा करायची. कुणीली वेलमध्ये उतरलेलं नव्हतं. संसद ही जागाच चर्चेसाठी असते आणि सकाळीही आम्ही चर्चेची मागणी केली होती, तीही धुडकावून लावली. सत्ताधारी एकीकडे चर्चेला तयार आहोत, असं म्हणत होते मात्र, केंद्र सरकारला यावर चर्चा करायचीच नव्हती असं त्यांच्या वागण्यावरुन दिसून येतंय. हे देशासाठी अत्यंत हानीकारक आहे. कुठलंही विधेयक असो, चर्चाही झालीच पाहिजे. संविधानाला धुडकावूनच संसदेत निर्णय घेतले जात आहेत. खरं तर ही आणीबाणीच आहे, मात्र, ते अधिकृतरित्या जाहीर नाहीये. मात्र ते स्वत:ला मन मानेल तसंच वागत आहेत.

खासदारांचं निलंबन पूर्वनियोजित

पुढे त्या म्हणाल्या की, राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन पुर्वनियोजत आहे. जेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना विधेयक मंजूर करण्यासाठी आकडे कमी पडत आहेत. तेंव्हा हे लक्षात घेता त्यांनी राज्यसभेतील बारा खासदारांचं निलंबन हेतुपूर्वक केलंय. तुम्ही या सगळ्याची क्रोनोलॉजी पाहा, तुम्हाला हे समजून येईल. त्यामुळे राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन हे स्क्रिप्टेड आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस अत्यंत वादळी ठरला आहे. पहिल्याच दिवशी कृषी कायदे मागे घेण्याचं विधेयक मांडण्यात आलं आणि ते पारित करण्यात आलं मात्र, विरोधकांनी वारंवार मागणी करुनही त्यावर चर्चा करण्यात आली नाही. याबाबत विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. या साऱ्या गदारोळात लोकसभा आणि राज्यसभा देखील तहकूब करण्यात आली. दुसरीकडे राज्यसभेतील 12 खासदारांचं निलंबन देखील पुढी सत्रासाठी करण्यात आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

Latest Marathi News Update: एमपीएससी गैरव्यवहार चौकशी,१६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

Youth Congress Protest in Karad Against Sanjay Gaikwad : शेतकऱ्यांच्या वक्तव्याचा निषेध; कऱ्हाडमध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवत युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन

Sakal Impact : 'सकाळ' इम्पॅक्ट; एमपीएससी गैरव्यवहार चौकशीला अखेर मुहूर्त, १६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT