Supriya Sule 
देश

मोदींच्या 'औरंगजेब-शिवाजी' वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला धरलं धारेवर

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : 'औरंगजेब आता है, तो शिवाजी भी उठ खड़े होते हैं' असे विधान करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (Narendra Modi) संदर्भ देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज लोकसभेत‌ सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

महाराष्ट्रात विरोधी पक्षांच्या नेत्यांना ईडी, सीबीआयच्या नोटीसा पाठविणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा सोईस्कर वापर करू नये, असे सुप्रिया यांनी सुनावले. विरोधक असला आणि तो कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्याच्या कुटुंबाला, महिलांना शिवाजी महाराजांनी कधीही लक्ष्य केले नव्हते, असा प्रहार खासदार सुळे यांनी संसदेत केला.

पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख काशी विश्वनाथ धाम कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी केला होता. त्याचा संदर्भ देत सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान सत्ताधाऱ्यांना भाजपवर टिकास्त्र सोडले. शिवाजी महाराज अन्यायाविरुद्ध उभे राहिले, असे पंतप्रधानांनी म्हटले होते. महाराष्ट्रात अनेक जणांची ईडी, प्राप्तिकराची प्रकरणे असतील. त्यातील चूक किंवा बरोबर याबाबत बोलायचे नाही. पण त्यांच्याकुटुंबियांना ज्या प्रमाणे लक्ष्य केले जात आहे, ही दुर्दैवी बाब आहे. छत्रपतींबद्दल सत्ताधाऱ्यांचे बोलणे भावनिक परंतु वर्तन वेगळे आहे. छत्रपतींनी नेहमी महिला, मुलांचे संरक्षण केले. ईडी, सीबीआयच्या छाप्यांमध्ये महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे सांगताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी श्रीमती खडसे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे कुटुंबिय यांना होणाऱ्या त्रासाचा उल्लेख केला.

राज्य सरकारांना जीएसटीच्या भरपाईसाठी होणारा विलंबाचा मुद्दाही उपस्थित केला. युपीएच्या सत्ताकाळात भाजपकडून कर दहशतवादाचे सरकार (टॅक्स टेररिजम गव्हर्न्मेंट) अशी टिका होत होती. परंतु ज्या प्रकारे जीएसटीची मागणी होते आहे छापे टाकले जात आहेत, यामागचे सत्य काय आहे? लोकांना तुरुंगात टाकले जाणार आहे काय, जीएसटीची वसुली खरोखर होते आहे, की कागदावरच आहे, अशी सवालांची फैरीही सुप्रिया सुळे यांनी झाडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT