

Sugarcane Price Protest kolhapur
esakal
Kolhapur Sangli Sugarcane Protest : ऊसदराची कोंडी कायम असतानाच सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ऊसदर आंदोलनाने आक्रमक वळण घेतले आहे. ऊसदर जाहीर न करताच ऊसतोड सुरू केल्याच्या निषेधार्थ राजाराम साखर कारखान्याच्या दिशेने ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर पेटवण्यात आला. तर कुरुंदवाड येथे कर्नाटकमध्ये साखर घेऊन जाणारा ट्रक स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडवून धरला. ट्रकमधील साखर शेतकऱ्यांना वाटण्याचा प्रयत्नही करण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे साखर कारखानदारांसमोरील आव्हान वाढले आहे.