रणदीप सुरजेवाला sakal
देश

Randeep Surjewala : सुरजेवालांवर ४८ तासांची प्रचारबंदी, लोकसभा निवडणुकीतील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई..

या लोकसभा निवडणुकीतील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली: भाजप नेत्या व अभिनेत्री हेमामालिनी यांच्याबाबत वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते व राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांच्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने कारवाई करताना ४८ तासांची प्रचारबंदी लागू केली आहे.

आयोगाच्या आदेशानुसार आज सायंकाळी सहापासून पुढील ४८ तासांपर्यंत सुरजेवाला यांना निवडणूक प्रचारात सहभागी होता येणार नाही. तसेच प्रसारमाध्यमांशीही संवाद साधता येणार नाही. या लोकसभा निवडणुकीतील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.

सुरजेवाला यांनी हरियानातील कैथल येथे एका प्रचार सभेत बोलताना भाजप नेत्या हेमामालिनींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडिओ भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केला होता. या प्रकरणात आलेल्या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक निवडणूक आयोगाने सुरजेवाला यांना नोटीस बजावली होती. तसेच ११ एप्रिलपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याची मुदतही दिली होती. तर, सुरजेवाला यांनी काहीही वादग्रस्त बोलल्याचा इन्कार केला होता. तसेच या वादाच्या प्रचारासाठी त्यांनी भाजपच्या आयटी सेलवर खापरही फोडले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT