Rahul Gandhi and Narendra Modi 
देश

Renuka Chaudhari: ...तेच मोदींबाबतही होणार का? 'त्या' विधानाबद्दल बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा

बदनामीच्या खटल्यात दोषी ठरल्यानं राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी हे बदनामीच्या खटल्यात दोषी ठरल्यानं त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. याचीच पुनरावृत्ती पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबतही होऊ शकते. कारण पंतप्रधानांना त्यांनी यापूर्वी सभागृहात केलेल्या एका आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री रेणुका चौधरी यांनी कारवाईची धमकी दिली आहे. (Surpanakha moment Renuka Chowdhury threatens to sue PM Modi says will courts act)

रेणुका चौधरी यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी पंतप्रधान मोदींना इशारा दिला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "पंतप्रधान मोदींनी सभागृहातच माझ्यावर 'शूर्पणखा' अशी जातीवाचक टिप्पणी केली होती. त्यामुळं मी आता पंतप्रधानांविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार आहे. बघुयात कोर्ट किती तत्परेतनं यावर कारवाई करतंय" असं लिहिताना त्यांनी मोदींचा तो व्हिडिओ देखील पोस्ट केला आहे.

रेणुका चौधरी यांनी या ट्विटद्वारे पंतप्रधानांना एक प्रकारे धमकीच दिला आहे. या धमकीमागे राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईचा संदर्भ आहे. पण जर चौधरी यांनी खरंच तक्रार दाखल केली, तर त्याची किती दखल घेतली जाईल किंवा ती तक्रार लागू होईल का? याबाबत नेटकऱ्यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर देताना चर्चा केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tragic Incident Kolhapur : कोल्हापूर जवळील प्रयाग चिखलीतील अवघ्या १५ वर्षीय मुलीनं उचललं टोकाचं पाऊल, आई वडील बाहेरगावी गेले अन्

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद सुरु

CA Success Story: आर्थिक परिस्थितीशी संघर्ष करत ओंकार झाला ‘सीए’; आई-वडील, बहिणीच्या डाेळ्यातून आनंद अश्रू, संघर्षमय यशाचे कौतुक

Mahabharat War: कसं घडलं महाभारातातील युद्ध? AI LIVE रिपोर्टींग VIRAL, ५१४२ वर्षे मागे जाल, साक्षात कृष्ण-अर्जुन सर्वांना पाहाल

शतकीय खेळीनंतरही यशस्वी जैस्वाल संघाबाहेर, तर आयुष्य म्हात्रेला संधी; रणजी सामन्यासाठी मुंबईचा संघ जाहीर...

SCROLL FOR NEXT