BBC IT Survey  esakal
देश

BBC IT Survey : 55 तासांमध्ये नेमकं काय तपासलं? बीबीसी मुंबई कार्यालयातला सर्व्हे संपला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (बीबीसी) या जगातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थेच्या भारतातील कार्यालयांचं इन्कम टॅक्स विभागाकडून कर सर्व्हेक्षण करण्यात आलं. यामुळं देशभरात खळबळ उडाली आहे.

मुंबई आणि दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयामध्ये आयकर विभागाचे अधिकारी (Income Tax Department) मंगळवारी सर्व्हे करण्यासाठी गेले. आयटीच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयावर अचानक जात कार्यालयातील अनेक पत्रकारांचे फोन ताब्यात घेतले होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

आता बीबीसीच्या मुंबई कार्यालयातील सर्वेक्षण संपलं आहे. तब्बल ५५ तासानंतर हे सर्वेक्षण संपलं आहे. यावेळी आयटी विभागाने कागदपत्र, पेनड्राईव्ह हस्तगत केले आहेत. एवढ्या कालावधीमध्ये नेमकं काय तपासलं? आणि हाताशी काय लागलं? याबाबत बाहेर माहिती मिळालेली नाही.

काही दिवसांपूर्वी बीबीसी या प्रसारण संस्थेनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील एक डॉक्युमेंट्री युट्यूबवर रिलीज केली होती. यानंतर भारत सरकारनं ती तातडीनं हटवली होती. या डॉक्युमेंट्रीतून बीबीसीनं भारताच्या पंतप्रधानांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारच्या या कृतीवर देशभरातून सरकारवर टीकेची झोड उठली होती.

''आम्ही भारतातील बीबीसीच्या कार्यालयात केलेल्या कर सर्वेक्षणाच्या अहवालांचे बारकाईने निरीक्षण करत आहोत'' असं युकेच्या सरकारी सुत्रांनी म्हटलं आहे. एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबई इथल्या कार्यालयांवर मंगळवारी सकाळी अचानक सर्व्हेक्षण करण्यात आलं. आता मुंबई कार्यालयातील सर्वेक्षण आटोपलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

ना तामिळ ना कन्नड 'या' गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमेक आहे लपंडाव ही मालिका ? प्रेक्षकांनीच लावला शोध

BSC Nursing Admission : ‘बी.एस्सी नर्सिंग’च्या प्रवेशासाठी १७ जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदत

Bhoom News : मंजूर असलेल्या रस्त्याचे काम करण्यासाठी नगर-तुळजापूर रोडवर ग्रामस्थांचे रस्ता रोको आंदोलन

कभी हस भी लिया करो! 'सन ऑफ सरदार 2' चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, अजय देवगन लग्नासाठी पुन्हा सरदारजीच्या अंदाजात धमाल करणार

SCROLL FOR NEXT