Amarnath Yatra Terrorist Arrested Esakal
देश

Amarnath Yatra: अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवाद्यांचा कट उधळला; शस्त्रसाठ्यासह एकाला मुसक्या

Terrorist Arrested: तपासणीदरम्यान बोमईकडून माचीपोराच्या दिशेने येणारे एक वाहन थांबविण्यात आले. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला पकडले.

आशुतोष मसगौंडे

अमरनाथ यात्रेदरम्यान सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर भागात सुरक्षा दलांनी एका संशयित दहशतवाद्याला अटक केली आहे. याची माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

रविवारी रात्री उशिरा सोपोरमधील बोमाई भागातील माचीपोरा येथे पोलीस, लष्कर आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) च्या जवानांनी संयुक्त चौकी उभारली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, तपासणीदरम्यान बोमईकडून माचीपोराच्या दिशेने येणारे एक वाहन थांबविण्यात आले. चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने त्याला पकडले. त्यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव वाहिद उल जहूर असे असून तो जिल्ह्यातील रफियााबाद भागातील रहिवासी आहे.

दरम्यान अटक केलेल्या दहशतवाद्याच्या वाहनातून दोन तुर्की बनावटीची पिस्तूल, तीन मॅगझिन, 41 राउंड, एक सायलेन्सर, दोन चिनी बनावटीचे ग्रेनेड आणि स्फोटक बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांच्या सहकार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास करण्यात येत आहे. अमरनाथ यात्रेदरम्यान दहशतवादी खोऱ्यातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सुरक्षा दल त्यांचा कोणताही डाव यशस्वी होऊ देणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT