nihah virus 
देश

कोलकातामध्ये निपाहमुळे जवानाचा मृत्यू झाल्याचा संशय

वृत्तसंस्था

कोलकाता : केरळमधील जवान आपली सुट्टी संपवून कामावर रुजू झाला. रविवारी कोलकातामधील कमांड रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. केरळमधून आलेल्या या जवानाचा मृत्यू निपाह व्हायरसमुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सिनू प्रसाद असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव असून ते 27 वर्षाचे होते. 

भारतीय लष्कराच्या पुर्व विभागाने दिलेल्या माहितीनूसार, सिनू प्रसाद यांची कोलकातामधील फोर्ट व्हिल्लीअम येथे नियुक्ती करण्यात आली होती. 20 मे ला त्यांना कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. प्रसाद हे केरळच्या पालक्कड जिल्ह्यातील रहीवासी होते. सुट्टीसाठी अनेक दिवसांपासून ते गावाला गेले होते. मोठ्या सुट्टीनंतर 13 मे ला ते कामावर रुजू झाले होते.   

या जवानाचा मृतदेह पुण्यातील राष्ट्रीय विषाणू परिक्षण संस्था पुणे (एनआयव्ही) येथे पाठविण्यात आला आहे. परंतु, हा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे आजूनही स्पष्ट करण्यात आले नाही. एनआयव्ही देशातील एकमेव संस्था आहे जिथे निपाह व्हायरसचे संशोधन सुरू आहे.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: शाब्दिक वादाला हिंसक वळण! रागाच्या भरात १५ वर्षीय मुलावर चाकूहल्ला अन्...; विरारमध्ये नेमकं काय घडलं?

World Cup 2027: विराटला सांभाळण्यासाठी गंभीरने RCB चा फॉर्म्युला वापरावा? माजी सहकाऱ्याचा मोठा सल्ला म्हणाला...

Farmer Relief: अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य सरकारकडून ३३४.९८ कोटींच्या मदतीला मंजुरी, मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

T20 WC India Semifinal Scenario : द. आफ्रिकेच्या पोरींनी बाजी मारली, भारतीय संघाची झोप उडवली; उपांत्य फेरीत कोण पोहोचणार अन् कसे?

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावर येईल 'ग्लो'! फॉलो करा या ५ सोप्या स्कीन केअर टिप्स

SCROLL FOR NEXT