G-20 modi 
देश

स्वागतम! G-20 परिषदेसाठी भारतात आलेल्या सर्व जागतिक नेत्यांचे शाही स्वागत; पाहा व्हिडिओ

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- जी-२० शिखर परिषदेसाठी जगभरातील प्रमुख नेते भारतात येत आहेत. ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय नेत्यांनी आज सकाळपासून दिल्लीच्या विमानतळावर हजेरी लावायला सुरुवात केली आहे. प्रत्येक नेत्याचे स्वागत भारतीय मंत्र्यांकडून केले जात आहे.

मंत्री अनुराग ठाकूर यांच्या कार्यालयाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जागतिक नेत्यांच्या स्वागताची झलक दाखवण्यात आली आहे. जवळपास ५०० नेते ऐतिहासिक अशा जी-२० शिखर परिषदेसाठी भारतात येत आहे. व्हिडिओमध्ये काही नेत्यांच्या स्वागताचे चित्रण दाखवण्यात आले आहे.

जी 20 शिखर परिषदेसाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे दिल्लीमध्ये आले आहेत. ऋषी सुनक यांचे केंद्रीय मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी स्वागत केलं. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा दुपारी दिल्लीमध्ये दाखल झाले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था आयटीसी मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये करण्यात आलीये.

कोण कोण आले?

भारतामध्ये आतापर्यंत इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलेनी, अरजेंटियाचे अध्यक्ष अल्बर्ट फर्नाडझ, आफिक्रन संघाचे प्रमुख अझली असायुमानी, युरोपीयन युनियनच्या अध्यक्ष व्रुसुला वोन डेर लायेन,आयएमएफ प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिवा, युरोपियन कॉन्सिलचे प्रमुख चार्ल्स मिचेल, डब्लूटीओ कार्यकारी प्रमुख नगोझी ओकनजो-इवेला, मॅक्सिकोच्या अर्थमंत्री रकेल बुईनरोस्ट्रो सानजेझ, ओईसीडी प्रमुख सचिव मॅथिस कोरमन हे दाखल झाले आहेत.

कोण कोण येत आहे ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सूनक, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज, जर्मन चांसलर ओलाफ स्कोल्झ, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक येओल, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन इत्यादी नेते परिषदेसाठी येत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Election 2026 Results Live : पुण्यात प्रभाग क्रमांक 39 मधून गुंड बापू नायरचा पराभव...

BMC निवडणुकीत विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी; भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट ते मनसे; कुणाचे किती उमेदवार जिंकले?

Latur Municipal Corporation Election Result 2026 : लातूरमध्ये विलासरावांच्या पुण्याईचा विजय, भाजपच्या सेल्फ गोलचा काँग्रेसने कसा उठवला फायदा ?

Baramati Municipal: बारामती नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी श्वेता योगेश नाळे यांची निवड; शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्याचा प्रयत्न करणार!

Ichalkaranji Result 2026 Won Candidate List : इचलकरंजीत भाजपचा बोलबाला की धक्का? चुरशीच्या लढतीनंतर महापालिकेत सत्ता कुणाची? वाचा विजयी उमेदवारांची यादी

SCROLL FOR NEXT