Swami Om to contest LS polls from New Delhi constituency
Swami Om to contest LS polls from New Delhi constituency 
देश

Loksabha 2019 : 'बिग बॉस'मधील स्वामी ओम निवडणुकीच्या रिंगणात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : बिग बॉस मालिकेतील माजी स्पर्धक व स्वयंघोषित बाबा स्वामी ओम हे लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून, नवी दिल्ली मतदार संघामधून आपण निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

बिग बॉस कार्यक्रमात स्पर्धक म्हणून स्वामी ओम यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमादरम्यान ते चर्चेत आले होते. शिवाय, वादग्रस्त वक्तव्य करून ते कायम चर्चेत राहतात. स्वामी ओम यांनी अरविंद केजरीवाल यांच्या हिंदू विरोधी धोरणांच्या विरोधात लढाई करणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले. अनेक हिंदू संघटनांनी घेतलेल्या बैठकीत स्वामी ओम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे समजते.

'बिग बॉस-10' मधून वादग्रस्त होऊन बाहेर पडलेले स्वामी ओम यांचा एका बिकनी घातलेल्या मॉडेलसोबतचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल झाला होता. त्यांनतर ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. मात्र, संबंधित व्हिडिओ हा आगामी एका चित्रपटामधील दृश्य असल्याचे स्वामी ओम यांनी सांगितले. स्वामी ओम हे वादग्रस्त व्यक्तिमत्व कायम विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात स्वामी ओम यांनी महिलेला मारहाण केली होती. त्याशिवाय स्वामी ओम बिग बॉस सारख्या रिएलिटी शोमध्ये विविध वक्तव्यामुळे गाजले होते. स्वामी ओम हे निवडणूकीच्या रिंगणात उतरल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले असून, त्यांची भाषणेही वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

स्वामी ओम यांची वादग्रस्त मालिका:

  • देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला होता.
  • दिल्लीत नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्वामी ओम यांना मारहाण झाली होती.
  • 2008 मध्ये स्वामी ओम यांच्याविरोधात त्यांच्या भावानेच सायकल चोरल्याची तक्रार पोलिसांकडे केली होती.
  • अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काही जण जंतरमंतर येथे जमले होते, त्यावेळी कोणालाही पूर्वकल्पना न देता स्वामी ओम त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी ओम स्वामी यांना बेदम मारहाण केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

Latest Marathi News Live Update : कल्याणमध्ये होणार नरेंद्र मोदींची जाहीर सभा

संतापजनक! वन-वे रोडवर रिक्षा चालकाने अचानक यू-टर्न घेतला अन् तरुणाचा जीव गेला; पाहा धक्कादायक व्हिडिओ

SCROLL FOR NEXT