Fact Check: भाजप एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करेल, असा दावा करणारा अमित शहांचा व्हायरल व्हिडिओ एडिटेड

Amit Shah On OBC ST SC Reservation: "संविधान बदलता यावे यासाठी ते 400 जागा जिंकूण देण्याची मागणी करत आहेत,” असे व्हिडिओ शेअर करणाऱ्या एक्स युजरने लिहिले आहे.
Amit Shah
Amit ShahAmit Shah, Sakal

Created By: न्यूजमीटर

Translated By : सकाळ डिजिटल टीम

2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर, भाजप सरकार अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि इतरा मागासवर्गीयांचे (OBC) आरक्षण' रद्द करेल असे सांगणारा गृहमंत्री अमित शहा यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Amit Shah On OBC ST SC Reservation)

दावा

“तुमचे मत देण्यापूर्वी, गृहमंत्री अमित शाह यांचे हे विधान ऐका जिथे ते आरक्षण संपवणार असल्याचे सांगत आहेत, संविधान बदलता यावे यासाठी ते 400 जागा जिंकूण देण्याची मागणी करत आहेत,” असे व्हिडिओ शेअर करणाऱ्या एक्स युजरने लिहिले आहे.

अनेक X हँडल्सनी हा दावा करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ ट्रेंड होत आहे.

'एक्स'वरील (Twitter) पोस्टचं Archieve Version येथे पाहता येईल.

Amit Shah
Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

सत्य

या दाव्याबाबत तपासणी केल्यानंतर न्यूजमीटरला आढळले की, हा व्हिडिओ संपादित केलेला आहे. मूळ व्हिडिओमध्ये शाह तेलंगणात सत्तेवर आल्यास मुस्लिमांचे असंवैधानिक आरक्षण रद्द करण्याविषयी बोलत आहेत.

हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिल्यानंतर न्यूजमीटरच्या लक्षात आले की, यामध्ये V6 News चा लोगो आहे. यावरून न्यूजमीटरने V6 न्यूज तेलुगू यूट्यूब चॅनेलवर मूळ व्हिडिओ शोधला आणि 'केंद्रीय मंत्री अमित शाह मुस्लिम आरक्षणावर टिप्पणी करताना' या शीर्षकाचा 23 एप्रिल रोजी प्रकाशित केलेला व्हिडिओ आढळला.

व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये 2:38-मिनिटांच्या टाइमस्टॅम्पवर दिसते. “भाजपचे सरकार आल्यास आम्ही असंवैधानिक मुस्लिम आरक्षण रद्द करू. तेलंगणातील एससी, एसटी आणि ओबीसी समुदायाला हे मुस्लिमांचे संपवलेले आरक्षण देण्यात येईल, असे ”शहा म्हणाले.

Amit Shah
Fact Check: शिरूरमध्ये आढळराव-पाटलांना देवदत्त निकम यांनी पाठिंबा दिल्याचा दावा खोटा, वाचा व्हायरल फोटोमागील सत्य

दुसरीकडे 24 एप्रिल 2023 रोजी टाईम्स नाऊनेही असेच वृत्त दिले की, शहा यांनी भाजप सत्तेत आल्यास तेलंगणातील 4 टक्के मुस्लिम आरक्षण संपुष्टात आणण्याचे आश्वासन दिले आहे. धर्मावर आधारित आरक्षण संविधानाच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले होते.

निष्कर्ष

वरील सर्व बाबी तपसल्यानंतर, शहा यांची व्हायरल झालेली क्लिप जुनी असून, ती संपादित करण्यात आलेली आहे, असा न्यूजमीटर निष्कर्ष आहे. त्यामुळे शाह यांनी एससी, एसटी आणि ओबीसी आरक्षण रद्द करणार असल्याचा दावा खोटा खोटा आहे.

'न्यूजमीटर' या संकेतस्थळाने याबाबतचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. शक्ति कलेक्टिव्हचा भाग म्हणून 'सकाळ'ने याचं भाषांतर केलेलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com