Swati Maliwal  Sakal
देश

'मै फौजी की बेटी हूं...' म्हणणाऱ्या मालीवाल यांनीच वडिलांवर लावले शोषणाचे आरोप; नेटकरी म्हणतात...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी आपल्या वडिलांबाबत मोठा खुलासा केला आहे. स्वाती मालीवाल म्हणाल्या की, लहानपणी वडील मला मारायचे, त्यामुळे मी खूप घाबरायची आणि लाजायची.

एवढेच नाही तर दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा मालीवाल यांनी म्हटले की, माझे वडील माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे. ही माहिती समोर येताच सोशल मीडियावर हे प्रकरण चर्चेत येऊ लागले. त्यातच, आता त्यांचे जुने ट्विट व्हायरल होत आहे.

"मी लहान असताना माझे वडील माझ्यावर लैंगिक अत्याचार करायचे. ते मला खूप मारायचे. ते घरी आल्यावर मला भीती वाटायची आणि अनेकदा बेडखाली लपून बसायचे. त्यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर लोक त्यांचे जुने ट्विट सोशल मीडियावर शेअर करत आहेत, ज्यात त्यांनी आपल्या सैन्यात असलेल्या वडिलांचा उल्लेख केला आहे.

व्हायरल होत असलेल्या जुन्या ट्विटमध्ये स्वाती मालीवाल यांनी लिहिले की, मी एका सैनिकाची मुलगी आहे, मी सैन्यात वाढले आहे. मी देशासाठी काम करायला आणि देशासाठी जीव द्यायला शिकले आहे, जगातील कोणतीही शक्ती मला घाबरवू शकत नाही.

आता हे ट्विट शेअर करत एका युजरने लिहिले की, मग हा बाप कोण होता ज्याचा तुम्हाला २०१६ पर्यंत अभिमान होता? कोणतीही मुलगी तिच्या वडिलांबद्दल खोटे बोलत नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. मग ते खोटे काय? आजचे की 2016चे? उत्तर द्यावे लागेल, कारण तुम्ही जगातील सर्वात पवित्र नात्यावर आरोप केले आहेत.

अंबुज भारद्वाज नावाच्या युजरने लिहिले की, स्वाती यांना कालपर्यंत फौजी वडिलांची मुलगी असल्याचा अभिमान होता. आज त्याच वडिलांच्या सन्मानाचा प्रसिद्धीसाठी खुलेआम लिलाव झाला.

भाजप नेते हरीश खुराना म्हणाले की, 'आप'च्या लोकांच्या डीएनएमध्ये खोटे बोलून सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. आज पुन्हा एकदा स्वाती मालीवाल यांनी हे सिद्ध केले. स्वातीचं आजचं वक्तव्य स्वीकारावं की २०१६ मध्ये तिचं ट्विट स्वीकारावं हे मला कळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Project : शक्तिपीठ महामार्ग होणारच, मंत्री उदय सामंतांचे कोल्हापुरात वक्तव्य; सर्वांना विश्वासात घेण्याचे आवाहन

Parbhani News: शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांत होणार सुरळीत ; मनपाने एक कोटी ८५ लाख भरले; येलदरी, राहटी येथील पाण्याचे पंप सुरू

Latest Marathi News Live Update : कणकवली शहरात चोरट्यांची दहशत; तब्बल ८ दुकाने फोडली

Iran Israel Conflict : संघर्ष आणखीनच भडकला ! इस्रायलचा इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल क्षेत्रावर हल्ला; ५ ठार

Parbhani News: अवकाळीचा महापालिकेला दणका; दलदल, कचरा आला रस्त्यावर ; नालेसफाईचे पितळ पडले उघडे

SCROLL FOR NEXT