Swati Maliwal Assult Esakal
देश

Swati Maliwal: "होय, स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाले, केजरीवाल कारवाई करतील," 'आप'ने स्वीकारले आरोप

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांनीहा या संपूर्ण घटनेची दखल घेत कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. स्वाती मालिवाल पक्षाच्या जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. आम्ही सर्व त्याच्यासोबत आहोत.

आशुतोष मसगौंडे

दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी मारहाण झाल्याचे आरोप आम आदमी पक्षाने स्वीकारले आहेत.

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, काल एक निंदनीय घटना घडली. स्वाती मालिवाल अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेल्या होत्या. त्या केजरीवाल यांची वाट पाहत असताना वैभव कुमारने त्यांच्याशी गैरवर्तन केले आहे. केजरीवाल यांनी याची दखल घेतली आहे ते योग्य कारवाई करतील.

या संपूर्ण प्रकरणावर पुढे बोलताना संजय सिंह म्हणाले, "स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनीहा या संपूर्ण घटनेची दखल घेत कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. स्वाती मालिवाल पक्षाच्या जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. आम्ही सर्व त्याच्यासोबत आहोत."

तत्पूर्वी, पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात जात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएने त्यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला. पोलिसांकडे अद्याप औपचारिक तक्रार आलेली नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना घडल्यानंतर मालीवाल यांनी पोलिसांना पीसीआर कॉल देखील केला होता. सोमवारी सकाळी 10 च्या दरम्यान दोन फोन आल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पथक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, सकाळी 9:34 वाजता पीएस सिव्हिल लाइन्स येथे एक पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये एका महिलेने सांगितले की सीएम हाऊसमध्ये तिच्यावर हल्ला करण्यात आला आहे. काही वेळाने खासदार मालिवाल सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये आल्या होत्या, मात्र नंतर तक्रार करणार असल्याचे सांगून निघून गेल्या.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाती मालीवाल यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिल्ली पोलिसांनी तक्रार घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT