Swati Maliwal Esakal
देश

Swati Maliwal : 'मुख्यमंत्र्यांचा PAने माझ्या पोटावर, तोंडांवर मारलं मी ओरडत...', स्वाती मालीवाल यांनी सांगितलं त्या दिवशी नेमकं काय झालं?

Swati Maliwal: दिल्लीच्या राज्यसभा खासदार आणि आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

दिल्लीच्या राज्यसभा खासदार आणि आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्या स्वाती मालीवाल यांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेच्या 81 तासांनंतर गुरुवारी अडीच पानांची तक्रार दाखल केली आहे. त्या दिवशी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती स्वाती मालीवाल यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सांगितली आहे. यानंतर दिल्ली पोलिसांनी स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या पीए बिभव कुमार यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. तक्रार दिल्यानंतर स्वाती मालीवाल यांनीही आपली बाजू सोशल मिडीया एक्सवर मांडली आहे. मालीवाल या गेल्या सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यांनी तेथून पीसीआर कॉल करून गैरवर्तनाचा आरोप केला. यानंतर त्यांनी सिव्हिल लाईन पोलिस ठाणेही गाठले, मात्र कोणतीही तक्रार न देता परत गेल्या.

राज्यसभा खासदाराच्या आरोपानंतर 'आप'ने डॅमेज कंट्रोल सुरू केले आणि स्वाती यांच्याबाबत 'आप'चे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी पक्ष त्यांच्यासोबत असल्याचे वक्तव्य केले आहे. बुधवारी संजय सिंह स्वाती मालीवाल यांना भेटण्यासाठी आले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या लॉबीमध्ये त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्यात आल्याचे स्वाती मालीवाल यांनी पोलिसांना सांगितले.

मालीवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या ड्रॉईंग रूममध्ये गेलो आणि तिथे थांबले होते, तेव्हा त्यांचे पीए आले आणि त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांनी हात देखील उचलला. मी आवाज केला आणि म्हणाले मला सोडा, मला जाऊ द्या. मात्र ते मला मारहाण आणि शिवीगाळ करत राहिले. धमक्या देत राहिले. त्यांनी स्वाती यांच्या तोंडावर, पोटावर मारले. मी धावत बाहेर गेले आणि पोलिसांना फोन केला.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलचे एक पथक गुरुवारी दुपारी 1.50 वाजता स्वाती मालीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी पोहोचले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी स्वाती मालीवाल यांच्याकडून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित गैरवर्तनाच्या घटनेची माहिती घेतली. सुमारे चार तास पोलिसांचे पथक मालीवाल यांच्या निवासस्थानी होते.

अडीच पानांच्या निवेदनात स्वाती मालीवाल यांनी 13 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या लॉबीमध्ये कसे गैरवर्तन करण्यात आले हे पोलिसांना सांगितले. सुरक्षा व्यवस्थेसह अनेक मुद्द्यांवर स्पेशल सेल टीमने स्वाती मालीवाल यांच्याशी चर्चा केली. स्पेशल सेलचे अतिरिक्त आयुक्त प्रमोद कुशवाह स्वतः मालीवाल यांच्या घरी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले.

स्वाती मालीवाल यांच्या माहितीच्या आधारे, दिल्ली पोलिसांनी आरोपी बिभव कुमार विरुद्ध कलम 354 , कलम 506, कलम 509, कलम 323 आणि इतर कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. यानंतर पोलिसांनी स्वाती मालीवाल यांना रात्री उशिरा वैद्यकीय उपचारासाठी एम्समध्ये नेण्यात आले.

निवासस्थानाची सुरक्षा वाढली: दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण दिल्लीतील स्वाती मालीवाल यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सध्या निमलष्करी दलाचे अनेक जवान निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास, त्यांची संख्या आणखी वाढविली जाऊ शकते.

'माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट होतं': या प्रकरणी स्वाती मालिवाल यांनी संध्याकाळी उशिरा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत माझ्यासोबत जे घडलं ते खूप वाईट असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणी मी माझी तक्रार पोलिसांना दिली आहे. योग्य ती कारवाई होईल अशी आशा आहे. गेलेले दिवस माझ्यासाठी खूप कठीण गेले. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्यांचे मी आभार मानतो. मी हे सर्व दुसऱ्या पक्षाच्या सांगण्यावरून करतोय, असे ज्यांनी सांगितले, त्यांनाही देव सुखी ठेवो.

देशात महत्त्वाच्या निवडणुका होत आहेत. स्वाती मालीवाल महत्त्वाचे नाहीत, देशाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. भाजपवाल्यांना विशेष विनंती आहे की त्यांनी या घटनेवर राजकारण करू नये.

त्या दिवशी नेमकं काय घडलं?

13 मे: स्वाती मालीवाल मुख्यमंत्र्यांना भेटायला पोहोचल्या, तिथून सकाळी 9.28 च्या सुमारास त्यांनी पोलिसांना फोन करून मारहाणीची माहिती दिली.

13 मे : स्वाती मालीवाल यांनी 112 वर कॉल केल्यानंतर सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशन गाठले, पण तक्रार न करता परतल्या.

14 मे : मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी विभव कुमार यांनी स्वातीसोबत गैरवर्तन केल्याची कबुली 'आप' खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली.

15 मे : खासदार संजय सिंह स्वाती मालीवाल यांना त्यांच्या डीडीयू मार्गावरील सरकारी निवासस्थानी भेटायला आले, पण स्वाती गप्प राहिल्या.

16 मे: दिल्ली पोलिसांचे एक पथक दुपारी 1:50 वाजता स्वाती मालीवाल यांच्या डीडीयू मार्गावरील सरकारी निवासस्थानी पोहोचले. संध्याकाळी 6.20 वाजता परतले.

16 मे : मालीवाल यांनी संध्याकाळी उशिरा ट्विट करत पोलिसांना निवेदन दिले की, त्यांच्यासोबत काहीतरी खूप वाईट घडले आहे. सायंकाळी उशिरा पोलिसांनी बिभव कुमारविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Changur Baba : अंगठ्या अन् रत्न विकायचा, ५ वर्षात जमवली १०० कोटींची माया; धर्मांतर रॅकेट प्रकरणी अटक केलेला छांगुर बाबा कोण?

बौद्ध धर्मगुरू दलाई लामांना 'भारतरत्न' देण्याची मागणी; 80 खासदारांनी केली पाठिंबा दर्शवणारी स्वाक्षरी, मोदी सरकार घेणार लवकरच निर्णय?

Guru Purnima 2025 Greeting Card: गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंसाठी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत

Oxford Graduate: ऑक्सफर्ड विद्यापीठाचा पदवीधर करतोय फूड डिलिव्हरी; दरमहा कमावतोय लाखो रुपये, म्हणाला...

Solapur Crime: निर्दयी मुलाने बापाला चाबकाचे फटके देऊन संपविले, घरात रक्ताचा पाट वाहिला तरी...सोलापूर हादरले !

SCROLL FOR NEXT