Haryana Election Result 
देश

Vinesh Phogat : "काँग्रेसचा बदला घेण्यासाठी 'इंडिया'शी गद्दारी; विनेश विरोधात देखील..."; स्वाती मालीवाल यांचे गंभीर आरोप

Assembly Election Result : हरियाना आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत.

रोहित कणसे

हरियाना आणि जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. यादरम्यान हरियानामध्यो भारतीय जनता पक्षाने मोठी मुसंडी मारली आहे. भाजपने येथे बहुमताचा आकडा ओलांडला आहे. आतापर्यंत येथे पाच राऊंडच्या मतांचीच मोजणी झाली आहे. यादरम्यान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या सर्व महासचिवांची बैठक बोलवली आहे. यादरम्यान हरियाणात किंगमेकर बनन्याच्या उद्देशाने मैदानात उतरलेल्या आपला मात्र खातेही उघडता आलेले नाही.

दरम्यान हरियाना विधानसभा निवडणुकीत एकूण ८९ जागांवर निवडणुक लढवलेल्या आम आदमी पक्षाला २ टक्क्यांहून देखील कमी मते मिळाल्याचे दिसत आहे. या निराशाजनक कामगिरीनंतर आपच्या बंडखोर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांनी आपच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे नाव न घेता स्वतःच्या गृहराज्यात त्यांना डिपॉझीट देखील वाचवता येत नसल्याचा टोला लगावला आहे.

स्वाती मालीवाल यांनी आरोप केला की, आम आदमी पक्षाने काँग्रेसची मते खाल्ली आहेत. त्या म्हणाल्या की, फक्त काँग्रेसचा बदला घेण्यासाठी हरियानाच्या मैदानात उतरले. माझ्यावर भाजपचा एजंट असल्याचे खोटे आरोप केले, आज स्वतः इंडिया आघाडीसोबत गद्दारी करत काँग्रेसची मते खात आहेत. सगळं सोडा, विनेश फोगाटलादेखील हरवण्यासाठी उमेदवार दिला. अशी परिस्थिती का झाली. की स्वतःच्या गृहराज्यात डिपॉझीट देखील वाचवू शकत नाहीयेत? अजूनही वेळ आहे, अहंकार सोडा, डोळ्यावरून पडदा दूर करा, ड्रामा करू नका आणि लोकांसाठी काम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Sports Minister: मोठी बातमी! माणिकराव कोकटेंचा राजीनामा नाहीच; आता क्रीडामंत्रिपद सांभाळणार

Vice President Election: उपराष्ट्रपतींच्या निवडीसाठी होणाऱ्या निवडणुकीत कोण-कोण करणार मतदान? यादी झाली तयार!

Modi Cabinet Decisions: मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले मोठे निर्णय; अश्विनी वैष्णव यांनी दिली माहिती!

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

सोलापूरकरांनो, रविवारी ‘हा’ मार्ग राहणार वाहतुकीसाठी बंद! वाहनांसाठी ४ पर्यायी मार्ग; पोलिस आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT