Swati Maliwal Assault Esakal
देश

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

Swati Maliwal Assault: आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल यांच्या प्रकरणी 13 मेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 'सकाळ' या व्हिडिओची पुष्टी करत नाही.

अंकिता खाणे (Ankita Khane)

आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्या मारहाण प्रकरणासंबधीचा १३ मे रोजी घडलेल्या घटनेचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे पीए असलेले बिभव कुमार वेगळे उभे असल्याचे दिसत आहेत. सुरक्षा कर्मचारी स्वाती मालीवाल यांच्याशी बोलत आहेत. यादरम्यान स्वाती मालीवाल सगळ्यांना धडा शिकवेन असं म्हणताना आणि बिभव कुमार यांना अपशब्द बोलताना दिसत आहेत.

स्वाती मालीवाल, मी पोलिसांना फोन केला आहे. पोलिसांना येऊ द्या. 'सकाळ'या व्हिडिओची पुष्टी करत नाही. दिल्ली पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली आहे.

व्हिडिओवर काय म्हणाल्या स्वाती मालीवाल?

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्वाती मालीवाल यांनी एक्स पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, दरवेळेप्रमाणेच यावेळीही या राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

पुढे त्या म्हणाला, "आपल्या लोकांना ट्विट करायला लावून, आणि कोणत्याही संदर्भाशिवाय व्हिडिओ लावून, तो हा गुन्हा करून स्वतःला वाचवेल असे वाटते. कोणी कोणाला मारहाण करताना व्हिडिओ बनवतो का? घरातील आणि खोलीतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर सत्य सर्वांसमोर येईल. देव सगळं पाहतोय. एक न एक दिवस जे खरं आहे ते जगासमोर येईल.

13 मे रोजी घडली ही घटना

13 मे रोजी स्वाती मालीवाल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. दरम्यान, स्वाती मालीवाल यांनी बिभव कुमार यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप करत पोलीस नियंत्रण कक्षाला (पीसीआर) फोन केला होता. मात्र, त्यांनी पोलिसांत तक्रार दिली नाही.

यानंतर पोलिसांनी स्वाती मालीवाल यांच्याशी संपर्क साधून तीन दिवसांनी गुरुवारी त्यांचा जबाब नोंदवला. यानंतर पोलिसांनी गंभीर कलमांखाली एफआयआर नोंदवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT