Delhi Enchrochment 
देश

जहांगीरपुरी : "द्वेषाचे बुलडोझर बंद करा"; राहुल गांधीचा केंद्रावर निशाणा

हनुमान जयंतीदिनी या भागात दंगल उसळली होती, त्यानंतर या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाईला सुरुवात झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हनुमान जयंतीदिनी दिल्लीतील जहांगीरपुरी भागात झालेल्या हिंसाचारानंतर इथं उत्तर दिल्ली महानगरपालिकेनं बुधवारी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरु केली. मात्र, या कारवाईला काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी विरोध दर्शवत केंद्रावर निशाणा साधला. "द्वेषाचे बुलडोझर बंद करा" असं राहुल गांधी यांनी या कारवाईला विरोध करताना म्हटलं आहे. (Switch off bulldozers of hate Rahul Gandhi slam demolition drive in violence hit Jahangirpuri)

देशात सध्या निर्माण झालेल्या कोळसा तुटवड्यावर राहुल गांधी यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी आरोप केला की, भारतात मंदीचं सावट होतं. यामुळं उच्च महागाई आणि उच्च बेरोजगारी अर्थव्यवस्थेत स्थिर मागणी दर्शवत आहे. ८ वर्षांत मोठ्या गप्पा मारल्यानंतर भारताकडं केवळ ८ दिवसांच्या कोळशाचा साठा शिल्लक आहे. मोदीजी मंदीचं सावट गहिरं होत आहे. ऊर्जा निर्मिती प्रकल्प बंद पडल्यानं लघु उद्योग उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक रोजगार बंद होत आहेत. त्यामुळं "द्वेषाचे हे बुलडोझर आता बंद करा आणि पावर प्लान्ट सुरु करा" अशा आशयाचं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.

दरम्यान, दिल्ली भाजपनं आरोप केलाय की, जहांगीरपुरीतील जे आरोपी आहेत. त्यांनी या ठिकाणी अनधिकृत बांधकामं केली आहेत. त्यामुळं ही बांधकामं पाडण्याची मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर लगेचच बुधवार आणि गुरुवारी नॉर्थ दिल्ली महापालिकेनं अशी बांधकामं पाडायला सुरुवात केली.

या कारवाईवर एमआयएम प्रमुख खसदार असदुद्दीन ओवैसी यांनी देखील विरोध दर्शवला आहे. ते म्हणाले, भाजपनं गरिबांविरोधात युद्ध पुकारलं आहे. ओवैसींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधत अतिक्रमण हटाव मोहिमेतील त्यांची भूमिका ‘संदिग्ध’ असल्याचं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाईंड अटकेत... २५ वर्षांपासून देशभरात चालवत होता रॅकेट, कोण आहे बिजेंद्र गुप्ता?

IND vs ZIM 2nd T20I: वैभव सुर्यवंशीची स्फोटक फलंदाजी आजही पाहायला मिळणार; भारत- झिम्बाब्वे दुसरा सामना किती वाजता अन् कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Live Updates Marathi : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; धरणांतील पाणीसाठ्याने मागील वर्षाची सरासरी ओलांडली

नवी पिढी प्रश्न विचारणारी, लॉजिक जाणून घेणारी; आदेशाऐवजी...; सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

Heavy Rain Effects: गुजरातमध्ये पावसाचा धुमाकूळ कायम, आसाममध्ये गंभीर स्थिती, काश्‍मीरमध्येही हजेरी

SCROLL FOR NEXT