Tadoba Tiger Journey eSakal
देश

Tadoba Tiger : जोडीदाराच्या शोधात ताडोबामधील वाघाने केला 2000 किलोमीटरचा प्रवास; चार राज्ये ओलांडत पोहोचला ओडिशामध्ये

Tadoba Tiger Journey : सुरक्षित ठिकाण आणि एखाद्या जोडीदाराच्या शोधात या वाघाने प्रवास सुरू केला होता.

Sudesh

Tiger Journey for finding Mate : ताडोबा अभयारण्यातील एक नर वाघ सध्या चर्चेत आला आहे. याला कारण म्हणजे, या वाघाने तब्बल 2000 किलोमीटर प्रवास पूर्ण केला आहे. चार राज्ये ओलांडून हा वाघ सध्या ओडिशामध्ये पोहोचला आहे. सुरक्षित ठिकाण आणि एखाद्या जोडीदाराच्या शोधात या वाघाने प्रवास सुरू केला होता.

साधारणपणे एखाद्या वाघाला रेडिओ कॉलर घातली असेल, तर त्याचं लोकेशन ट्रेस करून वन विभागाचे कर्मचारी त्याने किती प्रवास केला हे ओळखू शकतात. मात्र, या वाघाच्या बाबतीत असं झालेलं नाही. याच्या अंगावरील पट्ट्यांच्या पॅटर्नमुळे तो ओळखू आला, आणि तो ताडोबातून ओडिशामध्ये पोहोचल्याचं स्पष्ट झालं.

ओडिशाच्या जंगलामध्ये अचानक एक रॉयल बंगाल टायगर दिसल्याची माहिती एका वन कर्मचाऱ्याने दिली होती. यानंतर या वाघाचे पट्टे पाहून त्याची ओळख पटवण्यात आली. त्यातून हा वाघ ताडोबामधील असल्याचं स्पष्ट झालं.

देशातील हा एखाद्या वाघाचा दुसरा सर्वात लांब प्रवास असू शकतो. या वाघाने वाटेमध्ये कित्येक नद्या, डोंगर, शेत, रस्ते आणि गावं ओलांडली आहेत. या संपूर्ण प्रवासात एकदाही त्याने एखाद्या माणसावर हल्ला केल्याची घटना घडली नाही, अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT