drug trafficking
drug trafficking 
देश

ड्रग्ज ट्रॅफिकिंगचा 'मास्टरमाईंड' निघाला तमिळ फिल्म प्रोड्यूसर; 2 हजार कोटींची आतापर्यंत बाहेर देशात शिपमेंट

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि दिल्ली पोलिसांच्या टीमने संयुक्तपणे मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्ज ट्रॅफिक नेटवर्क चालवणाऱ्या तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. शिवाय ५० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. विशेष म्हणजे या ड्रग्ज ट्रॅफिकिंग नेटवर्क चालवणारा मास्टरमाईंड एक तमिळ फिल्म प्रोड्यूसर आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.(Tamil film producer mastermind of 2000 crore drug trafficking racket narcotics NCB)

एनसीबी डेप्युटी डायरेक्टर जनरल (DDG) ग्यानेशवर सिंग यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या लोकांनी कबुली दिलीये की, गेल्या तीन वर्षात त्यांनी स्यूडोफेड्रिनचे शिपमेंट केले आहे. यामध्ये आतापर्यंत ३,५०० किलो स्यूडोफेड्रिन बाहेर देशात पाठवण्यात आले आहे. याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात २ हजार कोटी इतकी आहे.

एनसीबीच्या प्रवक्ताने सांगितलं की, ड्रग्ज नेटवर्क भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया या देशांमध्ये पसरलेले आहे. केलेल्या कारवाईत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतून ५० किलो स्यूडोफेड्रिन जप्त करण्यात आलेत. स्यूडोफेड्रिनचा वापर मेथामफेटामाईन करण्यासाठी केला जातो.

स्यूडोफेड्रिन केमिकल हेल्थ पावडर म्हणून आणि वाळलेल्या नारळामध्ये ठेवून बाहेर देशात पाठवले जात होते. समुद्री मार्गाने ही ट्रॅफिकिंग होत होती. या गँगचा मास्टरमाईंड एक तमिळ फिल्म प्रोड्यूसर आहे. तो सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला पकडल्यानंतर स्यूडोफेड्रिनच्या मुळ स्रोताचा शोध लागेल.

दरम्यान, वाळलेल्या नारळामध्ये ठेवून स्यूडोफेड्रिन न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पाठवले जात असल्याची माहिती कस्टम अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.(Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT