crime news 
देश

Crime News: भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा दत्तक मुलीवर अत्याचार, गळा दाबून हत्या; पत्नीने दिली साथ

Tamil Nadu Shocker: भारतीय लष्करामध्ये अधिकारी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- तमिळनाडूच्या मदुराईमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भारतीय लष्करामध्ये अधिकारी असलेल्या एका व्यक्तीने आपल्या अल्पवयीन भाचीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केली आहे. संतापजनक म्हणजे या कामामध्ये अधिकाऱ्याच्या पत्नीने देखील त्याला साथ दिली आहे. जोडप्याने ही घटना दाबण्याचा प्रयत्न केला आहे. (Tamil Nadu Army Official Assaults 11 Year Old Adopted Daughter)

मिळालेल्या माहितीनुसार, २२ मार्च रोजीची ही घटना आहे. भारतीय लष्करातील अधिकारी सुभेदार पदावर जम्मू आणि काश्मिरमध्ये तैनात आहे. सुट्टीवर आल्यानंतर त्याने हे कृत्य केलं आहे. अधिकाऱ्याच्या पत्नीने ११ वर्षाच्या मुलीला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलं होतं. डॉक्टरांनी अल्पवयीन मुलीला मृत घोषित केलं. त्यानंतर यासंदर्भात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. तपासानंतर पोलिसांना धक्कादायक माहिती समजली. (Her Wife Attempts Cover Up)

माहितीनुसार, मुलीच्या आईचा लहानपणी मृत्यू झाला होता. वडिलांनी मुलीचा त्याग केला होता. त्यानंतर काकीने मुलीला दत्तक घेतले होती. पण या लहान मुलीवर तिच्या पतीकडून लैंगिक अत्याचार सुरु होते. २२ मार्च रोजी पीडितेला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं. यावेळी ती बेशुद्ध होती. मुलगी बेशुद्ध अवस्थेत सापडल्याचा काकीचा दावा होता. मुलीला तपासल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. डॉक्टरांना संशय आल्याने त्याने पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली होती.

पॉस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली. मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं आणि तिचा श्वास गुदमरुन मृत्यू झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला. त्यानंतर काकाने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे त्यांना आढळून आले. तसेच त्याने मुलीचा गळा दाबून ठार केल्याचं उघड झालं. धक्कादायक म्हणजे या लैंगिक अत्याचाराबाबत संपूर्ण माहिती त्याच्या पत्नीला होती. पण, तिने हे सर्व लपवण्याचा प्रयत्न केला.

मुलीने घटनेची आपबीती काकीला सांगितली होतं. पण, तिने उलट ही घटना लपवण्याचा प्रयत्न केला असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणात जोडप्याविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT