Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma 
देश

Tamil Nadu News : 'सनातन धर्म हा मलेरिया-डेंग्यूसारखा, याला...'; एमके स्टॅलिन यांच्या मुलाचं खळबळजनक वक्तव्य

रोहित कणसे

Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma : तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद पेटला आहे. सोशल मीडियावर भाजपसहित अनेक नेत्यांनी या विधानावर तिव्र नाराजी व्यक्त केला आहे. उदयनिधी यांनी त्यांच्या वक्तव्यात सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियाशी केल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

उदयनिधी म्हणाले की, सनातन धर्माचा फक्त विरोधत नवे तर याला नष्ट केले पाहीजे, उदयनिधी हे शनिवारी सनातन उन्मुलन सम्मेलनात बोलत होते. ते म्हणाले की, सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे, काही गोष्टींचा विरोध केला जाऊ शकत नाही, त्यांना नष्ट केले पाहीजे. आपण डेंग्यू, मच्छर, मलेरिया किंवा कोरोनाचा विरोध करू शकत नाही. या गोष्टी संपवल्या पाहिजेत. अशाच पद्धतीने सनातन देखील नष्ट केलं पाहिजे.

तमिळनाडुमधील सत्ताधारी पक्ष डीएमके सरकारनध्ये युवा आणि कल्याण तसेस क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावरून गोंधळ उडाला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांनी देशातील ८० टक्के लोकसंख्येच्या नरसंहाराचे अवाहन केल्याचा आरोप केला आहे.

अमित मालवीय म्हणाले की, तमिळनाडुच्या मुख्यमंत्र्याचे पुत्र आणि डीएमके सरकारचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची मलेरिया आणि डेंग्यू सोबत तुलना केली. त्याचं म्हणणं आगहे की याचा फक्त विरोधच नव्हे तर हे नष्ट केले पाहिजे. थोडक्यात हे सनातन धर्माचे पालन करणाऱ्या ८० टक्के भारतीय लोकांच्या नरसंहाराचे अवाहन करत आहेत. डीएमके विरोधकांच्या आघाडीतील एक प्रमुख पक्ष आहे आणि काँग्रेसचा दीर्घ काळापासून सहकारी पक्ष आहे. मुंबईतील बैठकीत याबाबत देखील एकमत झालं होतं का?

अमित मालवीय यांच्या सोशल मीडिया पोस्टनंतर उदयनिधी यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी आपण कधीही सनातन धर्माचे अनुसरण करणाऱ्यांच्या नरसंहाराचे आवाहन केलं नसल्याचे म्हटले आहे. मात्र उदयनिधी आपल्या वक्तव्यावर कायम आहेत. त्यांनी मी सनातन धर्मामुळे त्रस्त असलेल्या उपेक्षित समाजाच्यावतीने बोलत आहे असंही मालवीय यांना सुनावलं.

उदयनिधी त्यांच्या विधानावर ठाम

उदयनिधी म्हणाले की 'माझ्या वक्तव्याबाबत मी कोणत्याही कायदेशीर आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमके सरकार सामाजिक न्याय टिकवून ठेवणे आणि समतावादी समाजाच्या स्थापनेसाठी काम करत राहील. अशा प्रकारच्या भगवा धमक्यांना आम्ही घाबरत नाहीत, आम्ही पेरियार, अन्ना आणि कलैनार (करुणानिधी) यांचे आनुयायी आहोत आणि सामाजिक न्यायासाठी सतत लढत राहू असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT