देश

केस कापण्यासाठी ‘आधार’ची गरज सरकारचे निर्देश 

वृत्तसंस्था

तिरुअनंतपुरम - तमिळनाडूत लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात केशकर्तानलये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची लेखी नोंद ठेवण्याबरोबरच त्याचे आधारकार्डाची माहिती घेण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. 

महसूल प्रशासनाचे आयुक्त जे. राधाकृष्ण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एक परिपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सलून, ब्युटी पार्लर आणि स्पामध्ये ग्राहकांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधारकार्डचा क्रमांक लिहिण्यासाठी नोंदवही ठेवणे आवश्‍यक आहे. कोरोनाव्हायरसला प्रतिबंध आणि संक्रमणाचा शोध घेण्यासाठी सरकारने हा नियम केला असल्याचे सांगितले जात आहे. मात्र आधार क्रमांकाशिवाय ग्राहकांना सेवा द्यायची की नाही याचा उल्लेख परिपत्रकात केलेला नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरकारच्या अटी 
- सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी ग्राहकांनी आगाऊ नोंदणी करणे आवश्‍यक 
- निम्म्या क्षमतेनेच ग्राहकांना बोलवावे 
- वापरलेले ब्लेड, कापलेले केस, फेक पॅक यांची योग्य विल्हेवाट लावावी 
- वापरुन टाकून देण्यासारखा टॉवेलचा वापर 
- हेयर ड्रायरसारखी यंत्रे वापरण्यापूर्वी आणि प्रत्येक वापरानंतर सॅनिटाइज करावीत 
- वातानुकूलन यंत्रणा बंद ठेवावी 
- हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवाव्यात 
- कर्मचाऱ्यांसाठी पेपर नॅपकिन उपलब्ध करावेत 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupali Chakankar: मोठी घडामोड! रूपाली चाकणकरांचा राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...

Mumbai News : धावत्या जलद लोकलवर दगडफेक; महिला प्रवासी गंभीर जखमी

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

SCROLL FOR NEXT