tamilnadu crime 
देश

प्रेम नाकारलं! अकरावीच्या मुलीवर चाकूने सपासप 14 वार, आरोपीचा गूढ मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

एका १६ वर्षांच्या तरुणीवर २२ वर्षांच्या तरुणाने सपासप वार केले. प्रेम स्वीकारण्यास नकार दिल्याने केशवन नावाच्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललंय. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. तामिळनाडूतील त्रिचीमधील घटनेने खळबळ माजली आहे. (Crime News)

त्रिची येथील अथिकुलमची रहिवासी असलेली मुलगी अकरावीत शिकत होती. तिची परीक्षा संपल्यानंतर नातेवाईकाला भेटण्यासाठी जात असताना आरोपीने तिला रेल्वे ओव्हरपासजवळ अडवलं. केशवन याने मुलीचा पाठलाग केल्याचं एफआयआरमध्ये नमूद करण्यात आलंय.

मानापराईजवळ रेल्वे रुळांवर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली

पीडितेच्या एका नातेवाईकाने यासंदर्भात तक्रार दिली आहे. केशवनवर यापूर्वीच जून 2021 मध्ये त्याच मुलीचं अपहरण केल्याबद्दल पॉक्सो कायद्याअंतर्गत (POCSO) गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटकही करण्यात आलं होतं. तो नुकताच तुरुंगातून सुटला होता. हल्ला केल्याच्या दिवशी त्याने पीडितेवर प्रेम करत असल्याचं सांगितलं होतं. मुलीने नकार दिल्यावर केशवनने तिच्यावर 14 वार केले. त्यानंतर तो चाकू घटनास्थळी सोडून पळून गेला.

उपस्थितांनी मुलीला खाली पडताना पाहिलं. तिच्या शरीरातून रक्त येत असल्याचं दिसलं. त्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

आरोपीचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला

आरोपीचा मृतदेह मंगळवारी रात्री रेल्वे रुळावर मृतावस्थेत आढळून आला. केशवन नावाच्या गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी तीन पथके स्थापन केली होती. त्यांना मानापराईजवळ रेल्वे रुळांवर एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृतदेहाजवळून एक सेलफोन मिळवला आणि केशवनच्या वडिलांना आणलं. त्यांनी मृतदेहाची ओळख पटवल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या दराबाबत मोठी अपडेट! आज तुमच्या शहरात किती रुपयांना मिळतंय 22 कॅरेट सोनं?

ACB Action in Kadegaon : कडेगावात लाचलुचपतचा मोठा दणका! निकाल बाजूने लावण्यासाठी सहा हजारांची लाच मागणारा मंडल अधिकारी जाळ्यात

'काजोलसारखी दिसणारी दुसरी बाई माझ्यासमोर उभी केली आणि...' देवेंद्र गायकवाडने सांगितला 'तान्हाजी'मधील किस्सा, म्हणाला...

Latest Marathi News Live Update : रुपाली चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी

Sandeep Deshpande : "मराठी सण गुजरात्यांच्या हातात, याला जबाबदार लालबागचा राजा मंडळ", संदीप देशपांडेंची टीका

SCROLL FOR NEXT