Udhayanidhi Controversial Remark on Sanatana Dharma 
देश

Udhayanidhi: मी पुन्हा पुन्हा तेच बोलत राहीन; उदयनिधी स्टॅलिन यांचा 'सनातन' वक्तव्यावर हेका कायम

कार्तिक पुजारी

Tamil Nadu Minister Udhayanidhi Stalin says Sanatana Dharma eradicate

चेन्नई: तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र आणि डीएमके सरकारमधील मंत्री उदयनिथी स्टॅलिन यांनी सनातन धर्मावरुन केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन उदयनिधी यांच्यावर टीका केलीये. दुसरीकडे, उदयनिधी यांनी आपल्या वक्तव्याचे पुन्हा एकदा समर्थन केले असून पुन्हा पुन्हा मी तीच गोष्ट बोलत राहीन असं ते म्हणाले आहेत. त्यामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. दोन दिवसांपूर्वी मी एका कार्यक्रमात सनातन धर्माबाबत बोललो होतो. मी जे काही बोललो ती गोष्ट मी पुन्हा पुन्हा बोलेन. मी फक्त हिंदू धर्माचाच नाही तर सर्व धर्मांचा उल्लेख केला होता. मी धर्मातील जातीव्यवस्थेचा निषेध करताना ते बोललो होतो, आणखी काही नाही, असं उदयनिधी स्टॅलिन म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते.

विद्यार्थ्यांनी आयोजित एका कार्यक्रमात उदयनिधी बोलताना म्हणाले होते की, 'सनातन धर्माला विरोध नाही तर पूर्णपणे त्याचे निर्मुलन करायला हवे. जसे आपण कोरोना, डेंगु, मलेरियाला नष्ट करतो, तसेच आपण सनातन धर्माला नष्ट केले पाहिजे.' उदयनिधी यांच्या वक्तव्याचा भाजपने कडाडून विरोध केला आहे. भाजप नेत्यांनी या मुद्द्यावरुन इंडिया आघाडी आणि काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही यावर भाष्य केलं. हिंदूत्वाचा द्वेष यातून प्रकट होत आहे. काँग्रेस आणि इंडिया आघाडीची हीच भूमिका आहे. त्यांना देशाची संस्कृती नष्ट करायची आहे, असं म्हणत त्यांनी टीका केली. उदयनिथी यांच्या वक्तव्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. हिंदू द्वेषी पक्षासोबत तुम्ही हाथ मिळवत आहात का? असा सवाल राज्यातील भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे. त्यामुळे ठाकरे यावर काय बोलतात हे पाहावं लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT