Beauty Contest
Beauty Contest Sakal
देश

Social Viral : सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 5 पोलिसांची बदली, वाचा संपूर्ण प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

Beauty Contest Social Viral : सोशल मीडियावर सध्या एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामध्ये सौंदर्य स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 5 पोलिसांची बदली करण्यात आली आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये एका विशेष सहाय्यक पोलिस निरीक्षकासह पाच पोलीस कर्मचार्‍यांचा समावेश आहे. तमिळनाडूतील मायिलादुथुराई येथील ही घटना असल्याचे सांगितले जात आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण

31 जुलै रोजी मायिलादुथुराई जिल्ह्यातील सेम्बनारकोइल येथे एका खाजगी संस्थेने सौंदर्य स्पर्धेचे आयोजन केले होते. ज्यामध्ये या पाचही पोलिसांनी रॅम्प वॉक केला होता. या स्पर्धेत अभिनेत्री याशिका आनंद हिनेही विशेष निमंत्रित म्हणून सहभाग नोंदवून स्पर्धेचे उद्घाटन केले होते. याबाबतचे वृत्त दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर व्हायरल झाले.

5 पोलिसांच्या बदल्या

नागपट्टिनम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जवागर यांनी विशेष सहाय्यक निरीक्षक सुब्रमण्यम यांच्यासह रेणुका, अश्विनी, नित्यशिला आणि शिवनेसन या पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. हे सर्वजण सध्या सेम्बनारकोविल पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT