j Jayalalithaa Death Submits Report  esakal
देश

जयललितांचा मृत्यू कसा झाला? अरुमुघस्वामी आयोगानं मुख्यमंत्र्यांकडं अहवाल केला सादर

'जयललितांच्या सहकारी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात बरंच काही लपवलं आहे.'

सकाळ डिजिटल टीम

'जयललितांच्या सहकारी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात बरंच काही लपवलं आहे.'

चेन्नई : जयललिता (J. Jayalalithaa) यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती अरुमुघस्वामी आयोगानं (Arumughaswamy Commission) आपला अहवाल मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM MK Stalin) यांच्याकडं सादर केलाय. याप्रकरणी आयोगानं 590 पानी अहवाल तयार केला.

तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री आणि एआयडीएमके अध्यक्षा जयललिता यांच्या मृत्यूचं खरं कारण शोधण्यासाठी चौकशीची मागणी करण्यात आलीय. तामिळनाडूच्या (Tamil Nadu) पूर्वीच्या ईके पलानीसामी सरकारनं न्यायमूर्ती अरुमुघस्वामी यांच्या नेतृत्वाखाली जयललिता यांच्या उपचार आणि मृत्यूशी संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना केली होती. पन्नीरसेल्वम या आयोगासमोर हजर झाले.

'शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बरंच काही लपवलं'

ते म्हणाले, 'जयललितांना रुग्णालयात का दाखल करण्यात आलं ते मला माहीत नाही. त्यांच्यावर काय उपचार केले? अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांची कोणती टीम त्यांची देखभाल करत होती, हेही कळू शकलेलं नाहीय. मला राज्याच्या आरोग्य सचिवांकडून समजलं की, जयललितांना रुग्णालयात नेण्यात आलं.' पन्नीरसेल्वम यांच्या नेतृत्वाखालील AIADMK च्या अनेक नेत्यांनी आरोप केला होता की, जयललिता यांच्यासोबत कायम सावलीसारख्या असणाऱ्या त्यांच्या सहकारी शशिकला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात बरंच काही लपवलं आहे. मात्र, अद्यापही या आरोपांमधून कोणतंही तथ्य बाहेर आलेलं नाहीय.

चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जयललितांचं निधन

जयललितांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी अपोलो हॉस्पिटलकडून (Apollo Hospital Chennai) एक निवेदन आलं होतं. त्यात म्हटलंय की, जयललिता नुकत्याच बऱ्या झाल्या आहेत आणि त्यांना पाहिजे तेव्हा रजा घेता येईल, पण त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. 5 डिसेंबर 2016 रोजी रात्री 11.30 वाजता चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जयललिता यांचं निधन झालं. जवळपास 75 दिवस रुग्णालयात दाखल केल्यानंतर जयललितांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT