MK Stalin Sakal
देश

स्टॅलिन यांचा सत्तास्थापनेसाठी दावा

स्टॅलिन यांची मंगळवारी (ता. ४) द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

चेन्नई - तमिळनाडूच्या विधानसभा (Tamilnadu Assembly) निवडणुकीत (Election) जनतेचा कौल मिळाल्याने द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन (MK Stalin) यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित (banwari lal purohit) यांची राजभवन येथे बुधवारी भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. (Tamilnadu Assembly Stalins claim to power Politics)

स्टॅलिन यांची मंगळवारी (ता. ४) द्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. नव्याने निवडून आलेल्या द्रमुकच्‍या १३३ आमदारांची यादी आणि पक्षनेतेपदी त्यांची एकमताने निवड केल्याचे पत्र पुरोहित यांना सादर करून स्टॅलिन यांनी सत्तास्थापनेचा दावा केला आणि राज्यपालांनी त्यांना नवे सरकार स्थापनेसाठी निमंत्रण दिले. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे स्टॅलिन हे शुक्रवारी (ता. ७) राजभवन येथे शपथ घेणार आहेत. कोरोनामुळे शपथविधीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने होणार आहे. त्यादिवशी काही मंत्रीही शपथ घेणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात जुन्या अनुभवी नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे.

दरम्यान, नव्या सरकारच्या स्वागतासाठी फोर्ट सेंट जॉर्ज येथील सचिवालय सज्ज होत आहे. अण्‍णा द्रमुकच्या मावळत्या मंत्र्यांनी त्यांची दालने रिकामी केली असून तेथे रंगरंगोटी आणि नव्या मंत्र्यांच्या नावांच्या पाट्या तयार करण्याचे काम सुरू आहे.

पुदुच्चेरीत रंगास्वामी होणार मुख्यमंत्री

केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीतही यंदा सत्तापालट झाले आहे. तेथे अखिल भारतीय एनआर काँग्रेस (एआयएनआरसी)चे सरकार निवडून आले असून माजी मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांनी नायब राज्यपाल तमीळसाई सुंदरराजन यांच्याकडे आमदारांची यादी सादर करून सत्तास्थापनेचा दावा आज केला. भाजपच्या सहा आमदारांच्या पाठिंब्यावर ‘एआयएनआरसी’ सत्ता स्थापन करणार असून त्यातील दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येणार आहे तर अन्य चौघांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kagal Nagarparishad Election : हसन मुश्रीफ-समरजित घाटगे एकत्र; कागल नगरपरिषद बिनविरोध करण्याचा संकल्प

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अर्ज भरायला जाताना ‘या’ उमेदवारास १०० पोलिसांचा बंदोबस्त; पहाटे ५.३० वाजता उमेदवार नगरपंचायतीत, अनगरची बिनविरोधाची ६५ वर्षांची परंपरा खंडीत

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

SCROLL FOR NEXT