पेट्रोल 
देश

Tamilnadu Budget: 3 रुपये स्वस्त पेट्रोल, महिलांनाही खूशखबर

सकाळ वृत्तसेवा

तामिळनाडू विधानसभेचं आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झालं आहे. राज्याचे अर्थमंत्री पीटीआर पलानीवेल त्यागराजन यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. हे तामिळनाडूचं पहिलं ई-बजट होतं. कोरोना संकटामुळे तामिळनाडू सरकारने ई-बजट राबवलं होतं. या बजेटमध्ये तामिळनाडूनं पेट्रोलवरील टॅक्स तीन रुपयांनी कमी केला आहे. त्यामुळे राज्यात आता पेट्रोल तीन रुपये स्वस्त मिळणार आहे. या निर्णयामुळे तामिळनाडू सरकारला प्रत्येक वर्षाला 1160 कोटी रुपयांचं नुकसान होणार आहे.

सरकारी महिला कर्मचाऱ्यांनाही तामिळनाडू सरकारने खूशखबर दिली आहे. सरकारी महिला कर्मचाऱ्यांच्या मॅटरनिटी लिव्ह वाढवण्यात आली आहे. पूर्वी 9 महिने मॅटरनिटी लिव्ह मिळत होती. मात्र, आता वर्षभर सरकारी महिलांना मॅटरनिटी लिव्ह मिळणार आहे.

500 कोटी रुपयांची गुंतवणूक करुन सेंटर फॉर क्लाइमेट चेंज याची स्थापना करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व बचतगटासाठी 20 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. राज्यातील सर्व लहान-मोठ्या 79 हजार 795 गावातील प्रत्येक व्यक्तील स्वच्छ पाणी देण्याचा प्लॅन आखण्यात आला आहे. तसेच एक लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या 27 शहरांसाठीही भूमिगत गटारी योजना आखण्यात आली आहे. याशिवाय शेती आणि इतर उद्योग व्यावसायासाठी योजना लागू करण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT