Neet UG 2024 sakal
देश

Neet UG 2024 : प्रश्‍नपत्रिकेच्या बुकलेटमध्ये हस्तक्षेप झाल्याचे उघड

‘नीट-यूजी’ परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान पाटण्यातील आर्थिक गुन्हे विभागाला हजारीबाग येथे एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. प्रश्‍नपत्रिकेच्या एका बुकलेटमध्ये हस्तक्षेप केल्याचे उघड झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पाटणा : ‘नीट-यूजी’ परीक्षेतील पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या तपासादरम्यान पाटण्यातील आर्थिक गुन्हे विभागाला हजारीबाग येथे एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. प्रश्‍नपत्रिकेच्या एका बुकलेटमध्ये हस्तक्षेप केल्याचे उघड झाले आहे. हे बुकलेट हजारीबागमधील ओॲसिस शाळेतील केंद्रावर नेले जाणार होते.

आर्थिक गुन्हे विभागाच्या पथकाने २१ जून रोजी डीएव्ही, होली क्रॉस, ओॲसिस, सेंट झेव्हियर आणि विवेकानंद केंद्रीय या पाच शाळांमधील परीक्षा केंद्रांबरोबरच सर्व प्रश्‍नपत्रिका एकत्रित आणण्याच्या एसबीआय केंद्रावर आणि कुरिअर कार्यालयांवरही तपास केला होता. प्रश्नपत्रिकेच्या बुकलेट क्रमांक ६१३६४८८ मध्ये हस्तक्षेप केला गेल्याचे तपासात दिसून आले आहे.

निरीक्षक म्हणून नेमलेल्या विनोबा भावे विद्यापीठाच्या एका प्राध्यापकांनी या प्रश्‍नपत्रिका पाच मे रोजी ओॲसिस शाळेत पोहोचविल्या होत्या. या घटनेचे चित्रीकरणही करण्यात आले होते. परीक्षेच्या एक दिवस आधी, जी प्रश्‍नपत्रिका पाटण्यात आली होती, ती पेपरफुटी प्रकरणातील सूत्रधार संजीव मुखियाला व्हॉट्‌सॲपवर मिळाली होती.

तपास पथकाने केलेल्या तपासानुसार चार मे रोजी प्रश्‍नपत्रिका एसबीआय केंद्रावरच होती व पाच मे रोजी निरीक्षकांनी ती परीक्षा केंद्रावर नेली. त्यामुळे ती चार मे रोजी मुखियाला कशी मिळाली, याचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT