देश

Tariq Mansoor : मोदींच्या टीममध्ये आला मुस्लिम चेहरा! कोण आहेत तारीक मन्सुर ? भाजपच्या उपाध्यक्षपदी झाली निवड

सकाळ डिजिटल टीम

Tariq Mansoor : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज भारतीय जनता पक्षाचे नवीन टीम घोषित केली. 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी ही टीम घोषित केली. यावेळी काही चेहऱ्यांना काढण्यात आलं तर काही नवे चेहरे यात घेतले.

या टीम मध्ये उत्तर प्रदेश या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर नेत्यांना जागा मिळाली आहे. यात सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे विधान परिषद चे आमदार आणि पार्टीचे एक प्रमुख मुस्लिम चेहरा असलेले तारीक मन्सुर.

तारीख मन्सूर हे उत्तर प्रदेशात विधान परिषदेचे आमदार आहेत. २०१७ ते २०२३ असे सात वर्ष ते अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे चान्सलर होते. सुरुवातीपासूनच त्यांचे आणि आरएसएसचे चांगले संबंध राहिले आहेत. मन्सूर यांचे संघा सोबत खूप चांगले संबंध राहिले आहेत. त्यांच्या मुलाच्या लग्नाला स्वतः आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत आले होते.

याचबरोबर एन आर सी आणि सी ए एला विरोध जेव्हा अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी मध्ये झाला तेव्हा तारीख मन्सूर यांनी पोलिसांना युनिव्हर्सिटी मध्ये बोलावले होते. युनिव्हर्सिटी मध्ये पोलीस आले हे तेव्हा इतिहासात पहिल्यांदा झाले.

मन्सूर हे मुस्लिम समाजातील कुरेशी जातीमध्ये येतात. मुसलमान समाजामध्ये कुरेशींना पसमांदा म्हटलं जातं. या समुदायाला एकत्र करण्याचे निर्देश खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी भाजपाला दिले होते. यानुसारच संपूर्ण भारतामध्ये भारतीय जनता पक्ष रथयात्रा काढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT