Taslima Nasreen Taslima Nasreen
देश

तस्लिमा नसरीन म्हणाल्या, हिजाब, बुरखा आणि निकाब हे अत्याचाराचे प्रतीक

सकाळ डिजिटल टीम

हिजाबवरून कर्नाटकातील कॉलेजमधून सुरू झालेला वाद आता आंतरराष्ट्रीय स्तरावरही चर्चेचा विषय बनला आहे. बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनीही शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब घालण्यावर भाष्य केले आहे. हिजाब, बुरखा आणि निकाब हे अत्याचाराचे प्रतीक असल्याचे तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) म्हणाल्या.

इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. कर्नाटक उच्च न्यायालयात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब (Hijab) बंदीविरोधातील याचिकेवर सुनावणी सुरू आहे. मला वाटते शिक्षणाचा अधिकारच धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. काही मुस्लिमांना वाटते की हिजाब खूप महत्त्वाचा आहे. काहींना वाटते की ती एक अनावश्यक गोष्ट आहे. परंतु, सातव्या शतकात स्त्रीविरोधी लोक हे हिजाब घेऊन आले. कारण, ते महिलांना लैंगिक वस्तूंपेक्षा अधिक काही मानत नव्हते, असेही तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) म्हणाल्या.

स्त्रीकडे तेव्हाच बघितले जाईल जेव्हा शारीरिक गरज वाटेल. म्हणूनच महिलांनी बुरखा आणि हिजाब घालावा. त्यांनी स्वतःला पुरुषांपासून लपवावे. आजच्या समाजात स्त्री-पुरुष समान आहेत हे आपण शिकलो आहोत. म्हणूनच हिजाब (Hijab) आणि निकाब हे महिलांवरील अत्याचाराचे लक्षण आहे, असेही तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) म्हणाल्या.

कर्नाटकातील (karnataka) हिजाब प्रकरणाची हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. कालच्या सुनावणीत याचिकाकर्त्याच्या वकिलांनी बांगडी, बिंदी आणि पगडीबाबत युक्तिवाद केला. बांगड्या घालणाऱ्या हिंदू मुली, क्रॉस घातलेल्या ख्रिश्चन मुलींना शाळेतून हाकलले जात नाही, तर मुस्लिम मुलींना का हाकलले जाते, असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT