Taslima Nasrin Team eSakal
देश

"Surrogacy ने मुल मिळवणाऱ्या मातांना खरंच..."; तस्लीमा नसरीन यांचा सवाल

तस्लीमा नसरीन यांच्या या वक्तव्यानं नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

सुधीर काकडे

प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasrin) या नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींसाठी चर्चेत असतात. त्यांनी आता सरोगसीद्वारे माता बनणाऱ्या (Surrogacy) महिलांवर टीका करून नव्या वादाला तोंड फोडलं आहे. ट्विटरवर आपलं मत व्यक्त करताना त्यांनी, 'ज्या मातांना सरोगसीद्वारे रेडिमेड मुलं मिळतात, त्यांच्या भावना जन्म देणाऱ्या मातांसारख्याच असतात का?' असा प्रश्न उपस्थित केला आहे.

तस्लिमा नसरीनचं हे मत बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनास सरोगसीद्वारे पालक बनल्यानंतर समोर आलं आहे. मात्र, त्यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रियांका चोप्राचा कोणताही उल्लेख केलेला नाही. तस्लिमा नसरीन यांनी ट्विट केलं की, "मातांना सरोगसीद्वारे त्यांची रेडिमेड मुलं मिळाल्यावर त्यांना कसं वाटतं? मुलांना जन्म देणार्‍या आईसारख्याच भावना त्यांना मुलांबद्दल आपल्या मुलांबद्दल असतील का?

दरम्यान, तस्लिमा नसरीन पुढे असंही म्हणाल्या की, गरीब महिलांमुळे सरोगसी शक्य आहे. श्रीमंत लोकांना आपल्या स्वार्थासाठी समाजात नेहमीच गरिबी टिकवून ठेवायची असते. जर तुम्हाला एखादं मूल वाढवण्याची एवढीच इच्छा असेल, तर बेघर मुलाला दत्तक घ्या. मुलांना तुमच्या गुणांचा वारसा मिळाला पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Murli Manohar Joshi on Vishwaguru : "आपण आता ‘विश्वगुरु’ नाही!" भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला घरचा आहेर, राजकीय चर्चेला उधाण

IPL 2026 : पाजी, बरं झालं रिषभ पंतला तुम्ही घेतले! PBKS च्या चाहत्यांनी उडवली खिल्ली, Sanjiv Goenka यांचा चेहरा पडला... VIDEO

Nashik Crime : रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून सातपूरला पत्नीचे अपहरण; नाशिकमध्ये उडाली खळबळ

Latest Marathi News Live Update : TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीची तारीख जाहीर

राजा शिवाजी सिनेमात रितेशच्या धाकट्या लेकाने साकारलीये भूमिका ! ट्रेलरमध्ये दिसली झलक

SCROLL FOR NEXT