Delhi Rain
Delhi Rain ANI
देश

राजधानीत पाणीच पाणी; पावसाने मोडला ४५ वर्षांचा रेकॉर्ड

एएनआय वृत्तसंस्था

गेल्या २४ तासात दिल्लीच्या सफदरजंग भागात ११९.३ मिमी, पालममध्ये ६३.८ मिमी तर लोधी रोड भागात १२४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थानला जोरदार फटका दिल्यानंतर आपला मोर्चा हरयाणाकडे वळवला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम दुसऱ्या राज्यांवरही दिसून येत आहे. बुधवारपासून (ता.१९) दिल्ली-एनआरसीसह शेजारील राज्यांमध्ये पाऊस पडत आहे. दिल्लीत (Delhi) झालेल्या पावसाने गेल्या ४५ वर्षांतील रेकॉर्ड मोडित काढले आहेत. मे महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक ६० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याआधी मे १९७६मध्ये २४ तासात ५९ मिमी इतक्या पाऊस झाला होता. (Tauktae impact Delhi records highest 24 hour rainfall in May since 1976)

पावसाच्या सरी कोसळल्याने दिल्लीतील तापमानात घट झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या दिल्लीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे. दिल्लीत कमाल तापमान २३.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. सामान्य तापमानापेक्षा १६ डिग्री कमी आणि मे महिन्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे. १९५१ नंतर पहिल्यांदाच तापमानात इतकी घट झाली आहे. गेल्या २४ तासात दिल्लीच्या सफदरजंग भागात ११९.३ मिमी, पालममध्ये ६३.८ मिमी तर लोधी रोड भागात १२४.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे दिल्लीत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

दिल्लीसह उत्तर प्रदेश, राजस्थानचा उत्तर भाग, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्येही पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बर्फवृष्टी होत आहे. उत्तरकाशी, चमोली, पिथौरागड, डेहराडून, टिहरी, रुद्रप्रयाग, पौडी, बागेश्वर, नैनीताल, हरिद्वार या भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

तौक्ते चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरात आणखी एक वादळ घोंगावणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने (IMD) सांगितले आहे. २३-२४ मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा विकसित होण्यास सुरवात होईल. त्यामुळे पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. ओमानने या चक्रीवादळाचे नामकरण 'यास' असे केले आहे. अनुकूल वातावरणामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळे निर्माण होत असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT