tax evasion notice on chinese mobile company vivo oppo india xiaomi check deatails here  
देश

Oppo, Vivo अन् Xiaomi भारत सरकारच्या रडारावर, जाणून घ्या प्रकरण

सकाळ डिजिटल टीम

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी राज्यसभेत सांगितले की, सरकार तीन चिनी मोबाईल फोन कंपन्यांनी केलेल्या कथित कर चोरीच्या प्रकरणांची चौकशी करत आहे. या संदर्भात तिन्ही कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तीन चायनीज कंपन्या Oppo, Vivo India आणि Xiaomi या आहेत.

ओप्पो, विवो इंडिया आणि शाओमी या तीन प्रमुख चिनी मोबाईल कंपन्यांकडून भारत सरकार कथित कर चुकवेगिरीची प्रकरणांचा शोध घेत आहे आणि त्यांना अनुक्रमे नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. DRI (डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) ने Oppo India, Xiaomi India आणि Vivo India या मोबाईल कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.

एका लेखी उत्तरात सीतारामन यांनी सांगितले की, DRI ने केलेल्या तपासणीच्या आधारे, Oppo Mobiles India Ltd ला 4,403.88 कोटी रुपयांची कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे, तर Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया विरुद्ध सीमाशुल्क चोरीची पाच प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. उत्तरात असेही म्हटले आहे की अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) तपासणीत असे दिसून आले आहे की Vivo Mobiles India Pvt Ltd ने जुलै 2017 ते मार्च 2021 या कालावधीत प्रामुख्याने चीन आणि त्याच्या नियंत्रित प्रदेशांना 0.62 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. ज्यामध्ये त्यांची एकूण विक्री 1.25 लाख कोटी रुपयांच्या 49.91 टक्के इतकी आहे.

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ (CBIC) च्या संबंधात, 2019 ते 2022 पर्यंत, अशा 43 इतर कंपन्यांविरुद्ध खटले नोंदवले गेले आहेत. अर्थमंत्री म्हणाल्या की, सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटी) संदर्भात, तपास यंत्रणांनी दूरसंचार क्षेत्राशी संबंधित पाच कंपन्यांसबंधाक शोध आणि जप्तीची कारवाई केली आहे, ज्याममध्ये करचोरीची प्रकरणे समोर आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT