Chandrababu Naidu News esakal
देश

Political News : 2024 मध्ये हरलो तर निवडणूक कधीच लढवणार नाही; माजी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

वायएसआर काँग्रेस पक्षानं सभागृहात नायडूंच्या पत्नीचा अपमान केला होता.

सकाळ डिजिटल टीम

वायएसआर काँग्रेस पक्षानं सभागृहात नायडूंच्या पत्नीचा अपमान केला होता.

Chandrababu Naidu News : निवडणूक लढवण्याबाबत माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मोठी घोषणा केलीय. जर आमचा तेलगू देसम पक्ष (Telugu Desam Party) 2024 च्या निवडणुकीत सत्तेत परत आला नाही, तर ही माझी शेवटची निवडणूक असेल, असं नायडूंनी जाहीर केलंय.

बुधवारी रात्री उशिरा कुर्नूल जिल्ह्यातील रोड शोमध्ये भावूक झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी टीडीपी सत्तेत येईपर्यंत विधानसभेत पाऊल न ठेवण्याच्या आपल्या संकल्पाचा पुनरुच्चार केला. चंद्राबाबू नायडू म्हणाले, "जर मला विधानसभेत परतायचं असेल, राजकारणात राहायचं असेल आणि आंध्र प्रदेशला (Andhra Pradesh) न्याय द्यायचा असेल तर.. तुम्ही आम्हाला पुढच्या निवडणुकीत जिंकून दिल्यास, हे शक्य आहे. कारण, असं झालं नाही, तर ही माझी शेवटची निवडणूक असणार आहे."

चंद्राबाबूंनी लोकांना विचारलं, "तुम्ही मला तुमचा आशीर्वाद द्याल का? तुमचा माझ्यावर विश्वास आहे का?" यावेळी तिथं उपस्थित लोकांनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वायएसआर काँग्रेस पक्षानं (YSR Congress Party) सभागृहात नायडूंच्या पत्नीचा अपमान केला होता. त्यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यानं (चंद्राबाबू नायडू) 19 नोव्हेंबर 2021 रोजी ठराव केला की, त्यांचा पक्ष सत्तेवर आल्यानंतरच ते आंध्र प्रदेश विधानसभेत प्रवेश करतील. रोड शोमध्ये लोकांना आपल्या संकल्पाची आठवण करून देत चंद्राबाबू म्हणाले, जर आम्ही सत्तेत परतलो नाहीत तर पुढची निवडणूक आमच्यासाठी शेवटची असेल, असं त्यांनी जाहीर केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT