technology news  esakal
देश

Technology: शिक्षण पाचवी पास आणि बनवले हेलिकॉप्टर

वडिलांचे स्वप्न केले पूर्ण ; सर्वत्र चर्चा.

सकाळ डिजिटल टीम

आकाशात हेलिकॉप्टर उडण्याचा आवाज ऐकून सगळेच बाहेर धाव घेतात; तसाच रस्त्याच्या कडेने आकाशाकडे धाव घेणाऱ्या एकाने आपणही एक दिवस असे हेलिकॉप्टर बनवायचे हे स्वप्न मनी बाळगले. फक्त आपली इच्छा म्हणून नाही तर आपल्या वडिलांचे स्वप्न, की आपल्या मुलाने असे काहीतरी करावे की त्याला सर्वांनी ओळखावे ह्या ध्यासाने पाचवी पर्यंतचेच शिक्षण असतांनाही ते केले जे त्याच्यासाठी सहज सोपे अगदीच नव्हते.

5वी पास पण हेलिकॉप्टर बनवले

पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातील पूर्वस्थली ब्लॉकच्या घोला भागात राहणाऱ्या रेझौल शेखने हेलिकॉप्टर बनवले आहे. आज त्यांना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक त्यांच्या घरी पोहोचतात. हे करून रझौलने आपलेच नाही तर आपल्या वडिलांचेही स्वप्न पूर्ण केले आहे.

रेझौलने हे काम सुरू केले तेव्हा लोक त्याची चेष्टा करायचे. त्यावर हसायचे, पण रेझौल जिद्दीने आणि लोकांकडे दुर्लक्ष करत हेलिकॉप्टर तयार करत राहिले. आता लोक त्यांच्याबद्दल आदर आणि आस्था दाखवू लागले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते हेलिकॉप्टर बनवत आहेत. आता हेलिकॉप्टर तयार आहे, त्यात फक्त इंजिन बसवायचे आहे. येत्या एक महिन्यात रेझौलच्या वडिलांचे स्वप्न आकाशात उडणार आहे.

30 लाख रुपये झाले खर्च

रेझौल शेख हे व्यवसायाने जेसीबी पोक्लेनरचा व्यवसाय करतात. हेलिकॉप्टर बनवण्यासाठी त्यांनी आतापर्यंत 30 लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये लाखो रुपये खर्च होणे बाकी आहे. कोलकाता,पानागढसह देशातील विविध ठिकाणांहून त्यांनी हेलिकॉप्टर बनवण्याचे साहित्य मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या हेलिकॉप्टरचे इंजिन कर्नाटकातून येत आहे. इंजिनचे वजन सुमारे 4 टन असेल. आपले हेलिकॉप्टर अडीच टन वजनाने उड्डाण करू शकते, असा दावा रेझौल यांनी केला आहे. इयत्ता पाचवी पास रेझौलने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि तो इतरांसाठी प्रेरणा बनला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT