Marriage esakal
देश

पत्नीला 2 लाखांत विकून पतीनं विकत घेतला Mobile

सकाळ डिजिटल टीम

अल्पवयीन किशोर सोशल मीडियाच्या माध्यमातून 24 वर्षीय मुलीच्या संपर्कात आला आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.

लग्नाच्या दोन महिन्यांनंतर 17 वर्षीय किशोरनं आपल्या पत्नीला एका 55 वर्षीय व्यक्तीला 1 लाख 80 हजार रुपयांना विकलंय. राजस्थानात त्याला नुकतीच अटक करण्यात आलीय. अल्पवयीन आरोपी हा ओडिशातील (Odisha) बोलांगीर जिल्ह्यातील रहिवासी आहे. बेलपाडा पोलीस ठाण्याचे प्रभारी बुलू मुंडा यांनी सांगितलं, की अल्पवयीन किशोर सोशल मीडियाच्या माध्यमातून 24 वर्षीय मुलीच्या संपर्कात आला आणि दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं पारंपरिक पद्धतीनं लग्न लावून दिलं.

मात्र, लग्नानंतर बरोबर दोन महिन्यांनी किशोरनं काही आर्थिक समस्या सांगून आपल्या पत्नीला रायपूरला (Raipur) वीटभट्टीवर काम करण्यास सांगितलं. त्यामुळं पत्नीला घेऊन किशोर राजस्थानातील एका गावात पोहोचला. ऑगस्ट महिन्यात हे जोडपं रायपूर आणि झाशीमार्गे राजस्थानला वीटभट्टीवर काम करण्यासाठी गेलं होतं. दरम्यान, त्याचवेळी काही दिवसांनी किशोरनं आपल्या पत्नीला बारा जिल्ह्यातील 55 वर्षीय व्यक्तीला 1,80,000 रुपयांना विकलं.

आपल्या पत्नीला विकल्यानंतर, किशोरनं जेवणावर भरपूर खर्च केला आणि त्या पैशानं महागडा स्मार्टफोन देखील खरेदी केला. त्यानंतर किशोरनं पत्नीच्या वडिलांना ओडिशात घरी बोलावून, तुमची मुलगी कोणासोबत पळून गेलीय, असा आरोप केला. तद्नंतर मुलीच्या वडिलांनी किशोरविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता, किशोर खोटं बोलत असल्याचं स्पष्ट झालं.

तक्रारीच्या आधारे, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बोलांगीरचे एसपी नितीन कुसाळकर यांनी एक पथक तयार केलं होतं. एसपी म्हणाले, आम्ही त्याची चौकशी केली आणि त्यानं पत्नीला विकल्याचं समोर आलं. मुलीचा शोध घेण्यासाठी बोलांगीर येथील एक पथक राजस्थानला गेलं. ओडिशातील पोलिस पथकाला बारा गावात पोहोचल्यानंतर मुलीला वाचवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, कारण गावकऱ्यांनी रस्ता अडवून मुलीला घेऊन जायचं नाही, असं ठणकावून सांगितलं. 55 वर्षीय व्यक्ती म्हणाला, आम्ही तिला एक लाख 80 रुपयांना विकत घेतलंय, असं तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही, असं तो म्हणाला.

मात्र, राजस्थान पोलिसांच्या (Rajasthan Police) मदतीनं ओडिशातील टीम मुलीला जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्यात यशस्वी झाली. मुलीला कुठं जायचं आहे? विचारल्यावर तिनं ओडिशातील तिच्या पालकांकडे परत जायचंय, असं सांगितलं. त्यानंतरच गावकऱ्यांनी तिला सोडून देण्याचं मान्य केलं. दरम्यान, किशोरनं दावा केलाय, की त्यानं आपल्या पत्नीला विकली नाही. मात्र, तिला 60,000 रुपयाला गहाण ठेवलं होतं. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यानं शस्त्रक्रियेसाठी पैशांची गरज होती. म्हणून, हे कृत्य केल्याचं त्यानं सांगितलं. 17 वर्षीय तरुणाला शुक्रवारी बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fake Cancer Medicines Racket : कॅन्सरच्या बनावट औषधांचे मोठे रॅकेट उघड; ९० हून अधिक रुग्णालयांना पुरवठ्याचा संशय

Maratha Reservation: मराठा आरक्षणावर शिवेंद्रसिंहराजेंचा मोठा दावा; ‘तोंडाला पाने पुसणारे नव्हे, न्यायालयात टिकणारे आरक्षण देणार’

Kundan Sankhe Arrested : पालघर रिलीफ रुग्णालय राडा प्रकरण; निलंबित शिवसेना जिल्हाप्रमुखासह आठ जणांची पोलिसांसमोर शरणागती, राहुल घरतसह 22 जणांना पोलिस कोठडी

Marathi News Live Updates : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी; अमित शाहांसह उद्धव ठाकरे आज बाप्पाचं घेणार दर्शन

लालबागचा राजाचं दर्शन घ्यायचंय? जाणून घ्या पूजा आणि आरतीची वेळ, पाहा LIVE VIDEO

SCROLL FOR NEXT