tej pratap yadav 
देश

१२वी पास तेज प्रताप बिहारच्या पर्यावरण मंत्रीपदी; घरगुती हिंसेसह पाच गुन्हे दाखल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज खातेवाटप केले. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे मोठे चिरंजीव तेज प्रताप यादव यांना पर्यावरण, वन आणि हवामान मंत्रालयाची जाबाबदारी देण्यात आली आहे. (tej pratap yadav news in Marathi)

आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणारे तेज प्रताप दुसऱ्यांदा मंत्री झाले आहेत. 2015 मध्ये तेज प्रताप पहिल्यांदा मंत्री झाले होते. तेव्हा त्यांना पर्यावरणासह आरोग्य मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. तेज प्रताप यांचा जन्म 21 नोव्हेंबर 1987 रोजी बिहारमधील गोपालगंज येथे झाला. तेज प्रताप यांचे वडील लालू प्रसाद यादव आणि आई राबडी देवी हे दोघेही मुख्यमंत्री राहिले आहेत. तेज प्रताप यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. पदवीला प्रवेश घेतला होता, पण अभ्यास पूर्ण करता आला नाही.

तेज प्रताप यांना घोडेस्वारी आवडते. याशिवाय ते बासरीही उत्तम वाजवतात. तेज प्रतापचे बासरी वाजवतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. सदैव कृष्ण भक्तीत तल्लीन असलेल्या तेज प्रताप यांना संगीत ऐकणे आणि क्रिकेट खेळणे देखील आवडते.

तेज प्रताप नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. पत्रकार राजदेव रंजन यांच्या हत्येचाही आरोप त्यांच्यावर होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशीही झाली होती, पण त्यांना क्लीन चिट मिळाली होती. त्यानंतर तेज प्रताप यांना सुप्रीम कोर्टाकडून क्लीन चिटही मिळाली. तेज प्रताप यांच्यावर राज्य सरकारची जमीन ताब्यात घेऊन मंदिर बांधल्याचाही आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT