Tej Pratap Yadav likely to announce a new political party; Anushka’s rumored presence adds to the speculation.  esakal
देश

Tej Pratap Yadav :...अखेर तेजप्रताप यादव यांनी बिहार विधानसभा निवडणुकाबाबत मोठी घोषणा केलीच!

Bihar assembly election: २४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपणार आहे.

Mayur Ratnaparkhe

Tej Pratap Yadav to contest Bihar Assembly Election : बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहारचे माजीमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांचे मोठे पुत्र तेजप्रताप यादव यांनी आगामी बिहार विधानसभा निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे. तेज प्रताप यांनी यावेळी महुआ विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

तेजप्रताप यादव यांनी यापूर्वी म्हटले होते की, जर राजदने त्यांना तिकीट दिले नाही तर ते महुआ येथून  स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. तसेच, 'आम्ही महुआसाठी काम केले आहे, म्हणून आम्ही फक्त महुआ येथूनच निवडणूक लढवू. महुआला जिल्हा बनवू, ती आमची कर्मभूमी आहे. तिथले लोक म्हणत आहेत की जर राजदने दुसऱ्याला तिकीट दिले तर आम्ही त्यांना हरवू.'

याशिवाय तेजप्रताप यांनी आता सांगितले आहे की, 'आम्ही 'टीम तेज प्रताप यादव' स्थापन केली आहे. हा राजकीय पक्ष नाही तर एक खुलं व्यासपीठ आहे, जिथे सर्वांना सामील होण्याची आणि काम करण्याची संधी मिळेल. लोक 'टीम तेजप्रताप' मध्ये सामील होत आहेत आणि त्यांनी स्पष्ट केले की, आमचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत. तथापि, त्यांनी असेही म्हटले की सध्या पक्ष सुरू करण्याची कोणतीही योजना नाही.

तेजप्रताप यांची घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा बिहारच्या राजकारणात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यांनी असेही सांगितले की त्यांचे उद्दिष्ट समाजातील सर्व घटकांना प्रतिनिधित्व देणे आणि तरुणांना व्यासपीठ देणे आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, तेज प्ताप यांचे हे पाऊल केवळ राजदसाठी आव्हानात्मक असू शकत नाही.

२४३ सदस्यांच्या बिहार विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी संपत असल्याने, बिहार विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२५ दरम्यान होण्याची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने २५ जून २०२५ पासून मतदार यादीत सुधारणा करण्यासाठी विशेष पडताळणी प्रक्रिया सुरू केली आहे आणि घरोघरी जाऊन नावांची पडताळणी केली जात आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल आणि ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत अंतिम यादी प्रकाशित केली जाईल. निवडणुका दोन किंवा तीन टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT