Tejas Fighter Aircraft esakal
देश

Tejas Fighter Aircraft : राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात तेजस हलके लढाऊ विमान कोसळले

स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाचा पहिलाच अपघात

सकाळ डिजिटल टीम

जैसलमेर : राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यात तेजस हलके लढाऊ विमान आज कोसळले. सुदैवाने, वैमानिक सुखरूप बचावला. प्रशिक्षणावेळी ही दुर्घटना घडली. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाचा हा पहिलाच अपघात आहे.

हवाई दलाच्या निवेदनात म्हटले आहे, की प्रशिक्षण सुरू असताना तेजसचा अपघात झाला. अपघातातून वैमानिक सुखरूप बचावला. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, अशी माहितीही दिली आहे. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात कोसळलेल्या विमानातून मोठ्या प्रमाणावर काळा धूर बाहेर निघताना दिसतो. अपघातानंतर घटनास्थळी जमलेली बघ्यांची गर्दी पोलिसांनी पांगविली. जैसलमेरमधील कल्ला वसाहतीजवळ हे विमान कोसळले असले तरी अपघातात कसलीही जीवित किंवा वित्तहानी झाल नाही, असे जैसलमेरचे पोलिस उपअधीक्षक महेंद्रसिंह यांनी सांगितले. स्वदेशी बनावटीच्या तेजस विमानाची निर्मिती हिंदुस्थान ॲरोनॉटिक्स लि.ने केली आहे.

‘भारत शक्ती’ जवळ दुर्घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पोखरणमध्ये‘भारत शक्ती’ हा संरक्षण दलांचा सराव सुरू असतानाच तेथून १०० कि.मी.वर तेजस विमान दुर्घटनाग्रस्त झाले. लष्करासह हवाई दल, नौदलाने या सरावात भाग घेतला. तिन्ही दलाचे प्रमुख अधिकारीही सरावाला उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

US Iran Tensions : अमेरिका कधीही सुरु करु शकते युद्ध, सैन्य तैनात करणे फक्त इशारा नाही, इराणला कोणी केले सावध ?

IND vs PAK : प्लॅन फसला! पराभवानंतर पाकिस्तानच्या कॅप्टननं स्पिनर्सवर फोडलं खापर; म्हणाला, चुकांची किंमत मोजली

मुलुंड दुर्घटनेनंतर MMRDAने घेतली धास्ती, ताकही फुंकून पिणार; मेट्रो-४ मार्गिकेबाबत मोठा निर्णय

Construction Worker Scam: बीडमध्ये तीन हजार द्या अन् बांधकाम कामगार बना; कष्टकऱ्यांच्या घामावर डल्ला, बोगस नोंदी, कोट्यवधींच्या निधीवर दरोडा!

SCROLL FOR NEXT