Tesjashwi Yadav,Nitish Kumar sakal
देश

बिहारमध्ये विषारी दारूने 31 जणांचा बळी; तेजस्वींनी साधला नीतीशवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

ऐन दिवाळीच्या सणात गोपालगंज आणि बेतियामध्ये बनावट दारू मुळे ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. गोपालगंजमध्ये 20 जणांचा मृत्यू तर बेतियामध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. बनावट दारू पिल्याने अनेकांची दृष्टीही गेली आहे. याआधी गेल्या आठवड्यात मुझफ्फरपूरमध्येही मद्यपानामुळे ६ जणांना जीव गमवावा लागला होता. बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी दारूबंदीमुळे होणाऱ्या मृत्यूंसाठी नीतीश सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी ट्विट करत हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, बिहारमध्ये दिवाळीच्या दिवशी विषारी दारूमुळे 35 हून अधिक लोकांचा मृत्यू सरकारमुळे झाला आहे. कुणाच्या तरी लहरीपणामुळे बिहारमध्ये फक्त कागदोपत्रीच दारूबंदी आहे. येथे ब्लॅकमध्ये दारूविक्रिची लुटमार होत आहे.

नीतीश कुमार यांनी केले आवाहन

बिहारमध्ये विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंबाबत मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी म्हटले आहे की, 2016 पासून आम्ही दारूबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. बरेच लोक दारूबंदीच्या बाजूने आहेत. मद्यपान करू नका असे आवाहनही केले आहे. काहीतरी चुकत असेल. काही लोकांमध्ये चुका करण्याची प्रवृत्ती असते.

लोक माझ्या विरोधात बोलतात

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 'गडबड करणाऱ्या ठराविक लोकांना शिक्षा होते. तुरुंगातही जावे लागते. लोकांना यापासून दूर राहावे असे मी आवाहन करतो. दारूबंदी विरोधात काही लोक माझ्या विरोधात बोलतात. याची मी काळजी करत नाही.

पोलीस कर्मचारी निलंबित

अवैध धंदे रोखण्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी मोहम्मदपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक आनंद कुमार म्हणाले, ज्या अधिकारी आणि कर्मचाराच्या कार्यक्षेत्रातील तीन गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला. अशा मोहम्मदपूर पोलिस स्टेशनचे एसएचओ आणि एका कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT