Tejaswi Yadav Criticizes RSS and Vijay Rupani
Tejaswi Yadav Criticizes RSS and Vijay Rupani 
देश

संघांच्या गुंडांना देश तोडू देणार नाही : तेजस्वी यादव

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधातील भडकलेल्या हिंसेनंतर राजकीय वातावरण चांगले तापत आहे. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. या आरोप-प्रत्योरापानंतर आता बिहारचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी सांगितले, की ''संघांच्या गुंडांना देश तोडू देणार नाही''. 

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी टि्वट करुन सांगितले होते, की काँग्रेस पहिल्यांदा प्रवाशांना हिंसेसाठी डिवचते. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष हिंसेची निंदा करत ट्विट करतात. त्यामुळे काँग्रेस अध्यक्षांना यावर लाज वाटत नाही का? मुख्यमंत्र्यांनी आणखी एकावर ट्विटमध्ये सांगितले, की काँग्रेस पक्षाशी निगडित लोकांविरोधात कारवाई करणार का? असा सवालही त्यांनी केला.

त्यानंतर यावर तेजस्वी यादव यांनी ट्विट करून सांगितले, की ''श्री. मुख्यमंत्री तुम्ही विचार करणे सोडून दिले का? भारतीयांना प्रवासी म्हणण्याची तुमची हिंमत झालीच कशी? हे असे म्हणून तुम्ही असे बोलत इच्छिता का, एक प्रवासी उत्तर प्रदेशातून जिंकून पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. त्यामुळे तुमच्या या वक्तव्यावर तुम्ही माफी मागावी. आम्ही गुजरातच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील गुंडांना देश तोडू देणार नाही''.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT