KCR and Narendra mOdi
KCR and Narendra mOdi 
देश

KCR : आता 'केसीआर'ही भाजपच्या वाटेने? बीआरएसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आयएएस नियुक्त

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाकडून अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना भाजपने पक्षात घेऊन तिकटं दिली. यापैकी बरेच अधिकारी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. भाजपकडून निवडणूक प्रक्रियेत काम करणाऱ्यांना देखील संधी देण्यात आली आहे. आता भाजपप्रमाणेच भारत राष्ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखऱ राव यांनी आयएएस अधिकाऱ्याला पक्षात मोठी संधी दिली आहे. ( telangana cm k chandrasekhar rao news in Marathi)

माजी आयएएस चंद्रशेखर, माजी आयआरएस चिंताला पार्थसारथी आणि आंध्र प्रदेशचे माजी मंत्री रावेला किशोर बाबू यांच्यासह अनेक नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणाले की, देशाचे राजकारण आता बदलले आहे. इतर पक्ष धार्मिक दंगली, पैशांच्या जोरावर जातीनिहाय राजकारण करत आहेत.

दरम्यान आंध्रप्रदेश राज्याच्या बीआरएसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी आयएएस अधिकारी चंद्रशेखर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केसीआर म्हणाले की, जर हेतू शुद्ध आणि नियत साफ असेल तर असं काहीच नाही जे साध्य होऊ शकत नाही. या गोष्टी अनेकदा सिद्ध झाल्या आहेत.

केसीआर म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी राजकारण म्हणजे त्याग होता. स्वातंत्र्यपूर्व राजकारणात लोकांनी जीव, संपत्ती, कुटुंब आणि गरज पडल्यास जीवाची बाजी लावली. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली आपण संविधानावर काम करण्यास सुरुवात केली. वार्षिक योजना, पंचवार्षिक योजना आणून देशाची प्रगती झाल्याचंही चंद्रशेखर राव म्हणाले.

केसीआर पुढं म्हणाले की, राजकारण आणि सार्वजनिक जीवनात अनेक बदल झाले. मात्र गेल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत भारताने अद्याप कोणतेही ध्येय गाठलेले नाही. अजुनही लोकांच्या इच्छा आणि अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. अमेरिका आणि चीन आपल्यापुढे आहेत. अमेरिकेच्या भूभागापैकी केवळ २९ टक्के भूभाग शेतजमीन आहे. चीनकडे केवळ १६ टक्के शेतीयोग्य जमीन आहे. पण आपल्या देशात ५० टक्के जमीन शेतीसाठी योग्य आहे. तरी देखील आपण मागे असल्याचं केसीआर यांनी नमूद केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT