Telangana CM K Chandrasekhar Rao  
देश

"ऊपर शेरवानी, अंदर परेशानी": मोदींच्या पोशाखावर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची टीका

सादर झालेला अर्थसंकल्प भयंकर गोलमाल असल्याचे देखील त्यंनी म्हटले आहे.

निनाद कुलकर्णी

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री (Telangana Chief Minister) के चंद्रशेखर राव (K ChandraShekhar Rao) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या निवडणूक पोशाखावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मंगळवारी सादर झालेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पावर देखील टीका केली आहे. ते म्हणाले की, सादर झालेला अर्थसंकल्प हा कोणताही सार नसलेल्या शैलीचा असून, हा अर्थसंकल्प भयंकर गोलमाल असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, मोदी आणि केसीआर हे दोन्ही नेते लवकरच एका कार्यक्रमात समोरासमोर येणार आहेत. त्यापूर्वी केसीआर यांनी हा हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी ‘गुजरात मॉडेल’ची खिल्ली उडवत ‘वर शेरवानी, आत परेशानी’ अशी खोचक टीका करत, पीएम मोदींच्या सुशासनाचे उदाहरण म्हणून भाजप गुजरात मॉडेल दाखवत आहेत, असा देखील हल्लाबोल राव यांनी यावेळी केला आहे.

केसीआर यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीने (TRS) बहुतेक महत्त्वाचे कायदे किंवा संसदेतील मुद्द्यांवर मोदी सरकारला (Modi Government ) पाठिंबा दिला असून, केसीआर यांना अनेकदा भाजपची (BJP) बी टीम म्हटले जाते. परंतु त्यांच्या या टीकेनंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, येत्या शनिवारी केसीआर आणि पीएम मोदी एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास करणार असून, हे दोन्ही नेते हैदराबाद शहरा जवळ बांधण्यात आलेल्या संत रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करणार आहे. यासाठी 1,000 कोटी खर्च करण्यात आले असून, हा पुतळा जगातील दुसरा सर्वात उंच पुतळा असल्याचे देकील सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT