MBBS च्या 12 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी | Medical Student | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MBBS च्या 12 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी

MBBS च्या 12 विद्यार्थ्यांची राष्ट्रपतींकडे इच्छामरणाची मागणी

सहारनपूर : उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील मेडिकल कॉलेजच्या 12 विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाला (MBBS Student) परवानगी देण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्लोकल मेडिकल (Glocal Medical Collage) कॉलेजची मान्यता रद्द झाल्यामुळे या वैद्यकीय विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. याबाबत न्यूज18 हिंदीने वृत्त प्रकाशित केले आहे. (12 MBBS Students Demand Euthanasia From President)

हेही वाचा: युतीच्या नादाला लागू नका; राज ठाकरेंचे मनसैनिकांना सूचना

कुठूनही न्याय मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठत शहर दंडाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन देत इच्छामरणाला (Euthanasia) पररवानगी देण्याची मागणी केली आहे. वर्षानुवर्षे महाविद्यालयातील विद्यार्थी शिक्षण घेत राहिले, मात्र आजतागायत महाविद्यालयाला मान्यता मिळालेली नसून, विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून लाखो रुपयांची फी घेतल्याचा आरोपही या विद्यार्थ्यांनी केला आहे. सहारनपूर जिल्ह्यात, बसपा सरकारमध्ये एमएलसी आणि खाण व्यवसाय करणारे मोहम्मद इक्बाल यांचे हे ग्लोकल विद्यापीठ असून, याला अद्यापपर्यंत मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे येतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: MBBS प्रवेशाच्या नावाखाली साडेअकरा लाखाने फसवणूक, दोन आरोपींना अटक

निवेदनात नेमके काय

मेडिकल कॉलेजच्या (Medical Collage) विद्यार्थ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नगर दंडाधिकाऱ्यांना निवेदन दिले, त्यात ग्लोकल मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी 2016 मध्ये प्रवेश घेतल्याचे सांगण्यात आले आहे. आम्ही तीन-चार वर्षे सातत्याने एमबीबीएसचा अभ्यास सुरू ठेवल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असून, ग्लोकल मेडिकल कॉलेजमधील प्रत्येक विद्यार्थ्याचे 30 ते 35 लाख रुपये खर्च झाले असून, यापुढे कोणत्याही प्रकरचा खर्च करण्याची मनस्थिती नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रपतींना निवेदन देत इच्छामरणाची मागणी केली आहे.

Web Title: 12 Mbbs Students Demand Euthanasia From President In Up

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..