KCR with uddhav thackeray 
देश

भाजपला शह देण्यासाठी मास्टर प्लॅन? ममता दीदी आणि ठाकरेंच्या भेटीला तेलंगाणाचे CM

ओमकार वाबळे

देशात भारतीय जनता पार्टीला शहर देण्यासाठी संतुक्त पक्षांची आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन वर्षांपूर्वी शरद पवार यांनी भाजप विरहीत आघाडीचा प्रयत्न केला होता. त्यावेळी यश आलं नव्हतं. मात्र, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये पुन्हा निवडून आल्यानंतर राष्ट्रीत पातळीवर त्या अॅक्टिव्ह झाल्या आहेत. त्यांच्या सरकारचं अधिवेशन राज्यपालांनी तहकूब केलं. (KCR to meet Uddhav Thackeray and Mamata Banerjee)

महाराष्ट्रातही राज्यपाल सत्ताधाऱ्यांना जुमानत नसल्याची टीका महाविकास आघाडीतील नेते करतात. तेलंगणाचे मुख्यमंत्री केसी राव हे देखील भाजपच्या विरोधात आघाडीत एकत्र येण्यासाठी प्रयत्नशील दिसतात. यासाठी ते लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. यासोबतच ते ममता बॅनर्जी यांचीही भेट घेणार आहेत.

भाजप सरकारची धोरणं जनताविरोधी आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला हाकलून लावले पाहिजे, असा आरोप राव यांनी केला. भाजपविरोधी राजकीय पक्षांना एकत्र करण्यात मोठी भूमिका बजावणार आहे, असं ते म्हणाले. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राव यांनी केला. तसेच सत्य समोर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं प्रतिपादन केलं.

"मला डोसा खायचा आहे"

ममता बॅनर्जी यांनी मला फोन केला. आमच्यात चर्चाही झाली. त्यांनी मला बंगालला बोलावलं आहे. यानंतर त्या देखील हैदराबादला येणार असल्याचं म्हणाल्या. मला डोसा खायचायं असं त्या म्हणाल्या. यावर मीही त्यांना 'वेलकम' असं म्हटलंय. अशी माहिती मुख्यमंत्री केसीआर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar Airport: पुरंदर विमानतळाच्या जागेला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा धक्का; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली

Election Commission: आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दोन प्रवाह; सर्वोच्च न्यायालयामध्ये कायदेशीर काथ्याकूट

Maharashtra Drought: दुष्काळ आढाव्याला आचारसंहितेचा फटका; कृषिमंत्र्यांच्या पुणे आणि नागपूर विभागाच्या नियोजित बैठका रद्द

Latest Marathi News Live Update : दुष्काळ पाहणीसाठी दिवसभर शेतकऱ्यांचा खोळंबा; एकनाथ शिंदे अडीच-तीन तास उशिरा

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

SCROLL FOR NEXT