telangana home minister mahmood ali slaps security guard video goes viral  
देश

Telangana Minister : पुष्पगुच्छ देण्यास उशीर, मंत्र्यांनी सर्वांसमोर अंगरक्षकाला लगावली कानाखाली; व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

रोहित कणसे

तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांचा एक संतापजनक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते आपल्या अंगरक्षकाला चापट मारताना दिसत आहेत. हा व्हिडिओ राज्य मंत्रिमंडळातील पशुसंवर्धन मंत्री टी श्रीनिवास यादव यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यानचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

या व्हिडीओमध्ये कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर गृहमंत्री महमूद अली हे यादव यांना मिठी मारताना दिसत आहेत. यावेळी ते वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि त्यानंतर, ते पुष्पगुच्छ घेण्यासाठी त्याच्या अंगरक्षकाकडे वळले, परंतु त्याच्या हातात पुष्पगुच्छ नसल्यामुळे ते चिडले आणि लगेच त्याला चपराक लगावली.

वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा व्हिडिओ शुक्रवार (६ ऑक्टोबर) चा आहे. टी श्रीनिवास यादव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर, पुष्पगुच्छ वेळेवर न दिल्याबद्दल महमूद अलींने त्यांच्या गनरला चापट मारली, तेव्हा श्रीनिवास त्यांना शांत करताना दिसले. या संदर्भात गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांच्याशी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र चर्चा होऊ शकली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT